मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
कामाच्या SMS शिवाय,
एकही SMS येत नाही.
मित्रांच्या Callसाठी आता,
मिटींगही मोडता येत नाही.
बहुतेक कामाचा व्यापच आता,
सर्व जागा व्यापायला लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
फालतू विनोदावरही हसण्याची
सवय आता मोडायला लागलीय.
चेष्टेने केलेली चेष्टाही आजकाल,
भुरटेगिरी वाटायला लागलीय.
आणि वाटतय की आता,
धिंगाणाही कमी होऊ लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
पुर्वी वेळ सर्वांसाठी असायचा,
आता त्यांना वेळ ही नाही........
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
मान्य आहे स्वतासाठीही,
जीवन जगायचं असतं,
मग त्यासाठी कुणाला,
खरच का दुखवायचं असतं?n
पण हे मात्र खरं आहे की,
मित्राबरोबर मैत्रीचा अभिमानही वाढु लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय…
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous