११/२९/२०१७

होय असाच आहे मी


होय असाच आहे मी 
उसळणा-या लाटांनसारखा 
स्वःछंद फुलपाखरासारखा 
खळखळत्या पाण्यासारखा 
कसा आहे मी  ?????


थोडा सा वेडा थोडसा हळवा 

म्हटले तर प्रेमळ 

म्हटले तर स्वच्छ मनाचा 

 स्वःतावर प्रेम करणारा 
 नेहमी मैत्री जपणारा 
देवाने निर्माण केलेला अजब 
 रसायन आहे मी 
असाचं आहे मी 
असाचं आहे मी 
 मी आहेचं असा मैत्री करणारा 
 मैत्रिसाठी वाट्टेलते करणारा 
 प्रत्येक मित्र आणि मैत्रिणींचा विश्वास
जपणारा 
आयुष्यभर घट्ट मैत्रिची
साथ निभावणारा 
 मी आहेचं असा 
 सतत बोलणारा 
 मित्राना नको ते प्रश्न विचारणारा 
 प्रश्न विचारुन त्याना सतवणारा 
 उत्तरे सांग म्हणुन
तगादा लावणारा 
मी आहेचं असा मस्त जगणारा
 आपल्यातचं आपलेपण जपणारा 
पण इतरांच्या आनंदासाठी
स्वःतालाही विसरणारा 
 मी आहेचं असा 
 मनासारखं जगणारा 
यशाचे शिखर चढताना हात देणारा 
 अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा 
 सुःखाच्या रस्त्यावरून जाताना आयुष्य
सजवणारा 
 मी आहेचं असा 
सर्वांचे ऐकणारा 


 मित्रावर जास्त विश्वास ठेवणारा 
 त्यांच्या कोणत्याही निर्णयावर
समाधानी असणारा 
 मी आहेचं असा 
 मैत्री करणारा


संदर्भ: facebook share
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search