११/०२/२०१७

प्रेमावर कविता जमत नाहीउतार मिळायचा अवकाश 


आणि पाणि सहज वहावं

फक्त दिशा मिळायला हवी 

की वारयाने सहज वाहावंवाट सापडल्याचा अवकाश 
नदीने सहज प्रवाही व्हावं
हवेच्या सहज स्पर्शाने 
फुलाने अलगद डोलावं

वसंताच्या चाहुलीने 
कोकिळेने सहज गाणं गावं
वनराईच्या सौंदर्यावर 
ढगान्नी खुशाल बरसावं

न ठरवता अशाच प्रकारे 
सहज कोणावर मन जडावं
यामागची प्रेरणा काय 
हेच नक्की  कळत नाही
म्हणुन "प्रेम" या भावनेवर 
कधी मला कविताच सुचत नाही

शब्दांनी बांधलं जाणं 
त्या भावनेला अभिप्रेत नाही
मनात कोणाच्या वसतोय 
हेही तिला कळत नाही
मनामध्ये जाणवत राहते 
तरी व्यक्त होता येत नाही
म्हणुन प्रेम या भावनेवर 
कधी मला कविताच सुचत नाही..संदर्भ: facebook share
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search