११/२४/२०१७

मटण हंडी




तुमच्यासाठी झक्कास मटण हंडी ची रेसिपी !!!


लागणारे साहित्य:


दीड ते दोन  किलो मटणाचे तुकडे,
मीठ गरजेनुसार,अर्धा चमचा साखर,सहा ते सात किसलेले कांदे,दीड चमचा आल्याची पेस्ट,पाच ते सहा  हिरव्या मिरच्या,थोडीशी कोथिंबीर,एक  कप दही, एक चमचा लसणाची पेस्ट,अर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथी,दीड चमचा लाल मिरची,दीड  चमचा हळद,दोन बारीक केलेले टोमॅटो,दीड  चमचा गरम मसाला


कसे तयार कराल:

सर्वात प्रथम मटणाला अर्धी आलं-लसूण पेस्ट व दही लावून दोन तास ठेवा.एका मातीच्या वा कॉपर भांड्यात हंडीत २ चमचे तेल गरम करून त्यात कांदे लाल होई पर्यंत परतत राहा.त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, गरम मसाला घालून  परत परता.नंतर  उरलेली आले-लसूण पेस्ट, बारीक केलेले टोमॅटो, मटण व मीठ घालून परता.आणि झाकण लावून झाकणावर पाणी ठेवून मटण शिजू द्या, शिजल्या वर वरून कोथिंबीर पेरा.गरमागरम हंडी तयार.

संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :मनाली पवार


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search