११/०२/२०१७

सेक्‍स इन द सिटीलैंगिकता हा आपल्याकडे आजही कुजबुजण्याचाच विषय आहे. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत. खरं तर ज्या जोडप्यांचे लैंगिक संबंध निरोगी असतात त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदाचं असतं, हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणूनच असेल कदाचित, पण अलीकडे स्त्रियांच्या सेक्‍सविषयक भावनेविषयी काही प्रमाणात बोलू जाऊ लागलं आहे...


फोनवरून सेक्‍शुअल टेक्‍स्ट मेसेज अर्थात शृंगारिक आशयाचे एसएमएस करणं आणि नग्न फोटो एमएमएस करणं यात स्त्रिया पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत, असं एक सर्वेक्षण नुकतंच प्रसिद्ध झालंय. "एश्‍लेमेडिसन'ने केलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलंय, की असे एसएमएस करण्यात तरुणच नव्हे तर प्रौढ स्त्रियाही अग्रेसर आहेत. या स्त्रियांच्या मते हा मस्त विरंगुळा तर आहेच, पण त्याशिवायही रोजच्या चाकोरीबद्ध जीवनातलं ते मजेदार वळण आहे.

याचाच अर्थ लपून-छपून का होईना, स्त्रिया आपलं सेक्‍शुअल अर्थात लैंगिक आकर्षण व्यक्त करू लागल्या आहेत, त्यातल्या आनंदाची देवाणघेवाण करू लागल्या आहेत. अर्थात कुणी म्हणेल, हा परदेशातला सर्व्हे आहे. आपल्या भारतीय बायका तेवढ्या पुढे गेलेल्या नाहीत. यात काही अंशी सत्य असलं तरी ते पूर्ण सत्य नाही. कारण आपल्या एसएमएस सॅव्ही मैत्रिणींनी त्यांच्या मोबाइल इनबॉक्‍समध्ये डोकावलं तर एखादा तरी नक्कीच थोडासा शृंगारिक, चावट एसएमएस मिळू शकतो. एखाद्या मैत्रिणीने पाठवलेला असा एसएमएस दुसऱ्या मैत्रिणीला पाठवण्याचा मोह आवरणं फारच क्वचित कुणाला जमेल. ज्यांना विरक्ती आली आहे त्यांनाच बहुधा. कारण असे एसएमएस वाचायचे, हसायचे, जमल्यास फॉर्वर्ड करायचे आणि विसरायचे असेच असतात.

"आम्ही नाही बा त्यातले,' असं म्हणणं दांभिकपणाचं असतं, कारण ती माणसाची सहज प्रवृत्ती आहे. जगण्यातला अत्यंत महत्वाचा भाग असलेल्या किंवा आपल्याला तारुण्यात आणणाऱ्या याच तर भावना असतात. आपण वयात आलोय, ही जाणीव याच सेक्‍शुअल भावनांनी तर होत असते. आणि ती इतकी पारदर्शक आणि जिवंत असते की "झोपाळ्यावाचून झुलायचे' दिवस सुरू होतात. हीच लैंगिक भावना आपल्याला विरुद्ध लिंगी व्यक्तीच्या आकर्षणापर्यंत नेत असते आणि अनेकदा प्रेमातही पाडत असते.


अर्थात लैंगिक भावना या मनाला जेवढ्या कळतात त्याच्यापेक्षा किती तरी जास्त शरीराला जाणवतात, म्हणूनच त्या शरीरसंबंधांकडे घेऊन जात असतात. निसर्गाला प्रजोत्पादनाचं काम जागतं ठेवायचं असल्याने निसर्गाने या क्रियेमध्ये आनंद निर्माण केला आणि आकर्षणही. म्हणूनच तर हे मानवी जग अस्तित्वात आहे. मग या लैंगिक भावनांचा खुल्या मनाने स्वीकार आपण केव्हा करणार?


लैंगिकता हा आपल्याकडे आजही कुजबुजण्याचाच विषय आहे. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत. "बायकोला नवऱ्याकडून शृंगारापेक्षा प्रेमाची अपेक्षा असते' असं अमानवी विधान केलं जातं. (संदर्भ याच अंकातील राजन खान यांचा लेख. पान.58 ) जर स्त्रीला "वासना' (नकारार्थी नव्हे) नसती तर नातेसंबंध टिकले असते का? ज्या जोडप्यांचे लैंगिक संबंध निरोगी असतात त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदाचं असतं, हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणूनच असेल कदाचित, पण अलीकडे स्त्रियांच्या सेक्‍सविषयक भावनेविषयी बोलू जाऊ लागलं आहे. त्यावर वेगवेगळ्या स्तरांवर अभ्यास सुरू आहे. "टॉप टेन रिव्ह्यू'च्या मते इंटरनेट सर्फिंगमधला क्रमांक एकवर असणारा विषय आहे "सेक्‍स'. आणि या साइट्‌सना लपून-छपून का होईना, भेट देणाऱ्या तीनजणांपैकी एक असते स्त्री. म्हणजे सेक्‍शुअल एसएसएम करण्यात स्त्रिया आघाडीवर आहेत, या विधानाची खात्री पटायला हरकत नसावी...

संदर्भ: Sakal News Paper
लेखीका : आरती कदम

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search