११/०२/२०१७

शाकाहारी सॅंडवीच




लागणारे साहित्य:

दोन ब्रेडचे स्लाईस,सहा टे सात काकडीचे पातळ काप,पाच टोमॅटोचे पातळ काप,पाच टे सहा शिजलेल्या बटाट्याचे पातळ गोल काप, एक टे दोन कांद्याची पातळ चकती,एक चमचा बटर,चिमूटभर काळेमिरी आणि  मिठ,हिरवी चटणी तयार करण्यासाठीदिड कप कोथिंबीर,चार टे पाच हिरव्या मिरच्या,एक चमचा जिरपूड,किंचीत साखर,चवीनुसार मिठ,

कसे तयार कराल:

सर्वात आधी हिरवी चटणी बनवून घ्यावी. दिड कप कोथिंबीर, चार टे पाच हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरपूड, चवीनुसार मिठ, साखर आणि थोडे पाणी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून चटणी करावी.नंतर ब्रेडच्या कडा नको असतील तर काढून टाकाव्यात. दोन्ही ब्रेडच्या एका बाजूला आधी बटर आणि चटणी लावून घ्यावी.
एका ब्रेडवर आधी काकडीचे काप पसरून लावावेत. त्यावर टोमॅटोचे काप ठेवावेत. त्यावर काळीमिरी आणि मिठ टाकावे. त्यावर बटाट्याच्या चकत्या लावाव्यात, किंचीत मिठ पेरावे आणि त्यावर कांद्याची चकती ठेवावी. बटर आणि चटणी लावलेला ब्रेडचा स्लाईस यावर ठेवावा.आता सुरीने तुकडे करून घ्यावेत. आणि शाकाहारी सॅंडवीच तयार हे हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावे.

संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार



Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search