११/०४/२०१७

स्त्रीची सेक्सची इच्छा जागृत कधी होते?


पत्नी प्रेग्नंट असताना सेक्स करावा की करू नये, याबाबत आजही अज्ञान आहे. प्रेग्नंट काळात सेक्स केला तर पत्नी बरोबरच बाळाला धोका पोहचू शकतो, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्या मनातही निर्माण होणे स्वाभाविक आहे. स्त्रीच्या गर्भावस्थेत वाढ होते, तशा स्त्रीच्या समस्या या वाढत जात असतात. त्यामुळे अशा अवस्थेत सेक्स करताना जोखीम स्वीकारावी लागत असते. पत्नी प्रेग्नंट  असताना पोटावर कोणत्याही प्रकारचा दाब हा भ्रूण आणि त्या महिलेला धोकादायक ठरू शकतो.

स्त्री प्रेग्नंट  असल्यापासून  सहा महिन्यापर्यंत सेक्स केला जाऊ शकतो. परंतु, त्यातही मोठी जोखीम असते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन विशिष्ट प्रकारच्या आसनाचा अवलंब करण्याची आवश्यता आहे. आसन अशा प्रकारचे पाहिजे की‍ सेक्स करत असताना स्त्रीच्या पोट किंवा गर्भावर कोणत्याच प्रकारचा दाब पडता कामा नये.
स्त्री प्रेग्नंट राहिल्यानंतर सात महिन्यापर्यत सेक्स केला जाऊ शकतो, असा दावा आयुर्वेदातही करण्यात आला आहे. परंतु गर्भ मुलाचा असेल तर स्त्रीची सेक्सची इच्छा कमी असते. मुलीचा गर्भ असेल तर स्त्रीची सेक्सची इच्छा नेहमी जागृत असते, असे आयुर्वेदात म्हटले आहे.

गर्भावस्थेत नेहमी उदास असलेल्या महिलामध्ये ऊर्जा आणि उत्साह निर्माण होत नसल्यास सेक्सच्या आनंदापासून त्यांना वंचित रहावे लागत असते. काही महिलाना गर्भावस्थेत रक्तस्त्राव किंवा योनी पीडा होत असल्याने  त्या सेक्स करण्यास मज्जाव करत असतात.

पहिल्यांदा गर्भधारणा झालेल्या महिलांची पहिल्या आठवड्यात सेक्स करण्याची मुळीच इच्छा होत नाही. परंतु दोन ते तीन महिने उलटल्यानंतर या महिला सेक्सचा परिपूर्ण आनंद घेण्याची इच्छा व्यक्त करतात. प्रत्येक दिवशी सेक्स व्हावा, असे त्यांना सारखे वाटत असते. पुरुषानी आपल्या गर्भवती पत्नीच्या सहवासात अधिक काळ राहून तिची इच्छा पूर्ण केली पाहिजे. परंतु, काही महिला या होणार्‍या बाळाविषयी अधिक उत्सुक असतात. त्यामुळे पतीची लहर ओळखण्‍याकडे त्या फारसे लक्ष देत नाहीत. या काळात पुरूषांनी पत्नीला समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search