१२/२०/२०१७

दिनविशेष डिसेंबर २०


ठळक घटना आणि घडामोडी

 • १९४५ - मुंबई - बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू
 • १९७१ - झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.
 • १९८८ - मतदानाचे किमान वय २१वरून १८वर आणणारी ६१वी घटनादुरुस्ती संसदेत मंजूर.
 • १९९४ - राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान
 • २०१० - भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा 'साहित्य अकादमी पुरस्कार' जाहीर

सोळावे शतक

 • १५२२ - नाइट्स ऑफ ऱहोड्सची सुलेमान द मॅग्निफिसन्टपुढे शरणागति. जीवनदान मिळालेले हे सरदार माल्टात वसले व नाइट्स ऑफ माल्टाम्हणून प्रसिद्ध झाले.

एकोणिसावे शतक

 • १८०३ - लुईझियाना खरेदी पूर्ण.
 • १८६० - दक्षिण कॅरोलिना युनायटेड स्टेट्सपासून फुटून निघाले.

विसावे शतक

 • १९१७ - रशियात पहिल्या गुप्त पोलिस संस्थेची (चेका) स्थापना.
 • १९५२ - अमेरिकन हवाई दलाचे सी.१२४ जातीचे विमान वॉशिंग्टन राज्यात मोझेस लेक येथे कोसळले. ८७ ठार
 • १९७३ - स्पेनच्या पंतप्रधान ॲडमिरल लुइस कारेरो ब्लांकोचा माद्रिदमध्ये कार बॉम्बने खून.
 • १९८९ - ऑपरेशन जस्ट कॉझ - अमेरिकेने पनामातील मनुएल नोरिगाचे सरकार उलथविण्यासाठी सैन्य पाठविले.
 • १९९५ - नाटोचे शांतिसैन्य बॉस्नियामध्ये दाखल.
 • १९९५ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट ९६५ हे बोईंग ७५७ जातीचे विमान कोलंबियात कालीजवळ कोसळले. १६० ठार.
 • १९९९ - पोर्तुगालने मकाउचे बेट चीनला परत केले.

एकविसावे शतक

 • २००१ - आर्थिक अडचणीत सापडलेल्या आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो दि ला रुआला राजीनामा देणे भाग पडले.

जन्म

 • १५३७ - जॉन तिसरास्वीडनचा राजा.
 • १९४० - यामिनी कृष्णमूर्ती – भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका, पद्मश्री
 • १९४२ - राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश (Chief Justice)

मृत्यू

 • २१७ - पोप झेफिरिनस.
 • १७३१ - छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा
 • १९१५ - लेखक, समाजसुधारक व भारतीय छपाईतंत्रात महत्त्वाचे बदल आणणारे उपेंद्रकिशोर रॉयचौधरी
 • १९३३ - विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक, शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले.
 • १९५६ ‌ - देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.
 • १९८१ - संगीत दिग्दर्शक कनु रॉय
 • १९९३ - वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार
 • १९९६ - दगडू मारुती तथा ’दया’ पवार – ’बलुतं’कार दलित लेखक
 • १९९८ - बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी
 • २००४ - पोलीसकथालेखक व. कृ. जोशी
 • २००९ - कवी अरुण कांबळे
 • २०१० - सुभाष भेंडे – लेखक
 • २०१० - नलिनी जयवंत – अभिनेत्री

प्रतिवार्षिक पालन

 • मानवी ऐक्यभाव दिन.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search