१२/२१/२०१७

दिनविशेष डिसेंबर २१


ठळक घटना आणि घडामोडी

 • १८९८ - मारी आणि पिएर क्यूरी यांना रेडिअमचा शोध लागला.
 • १९०५ - स्वातंत्र्यवीर सावरकर बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले.
 • १९०९ - अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅकसनचा खून केला.
 • १९१३ - पहिले शब्दकोडे 'न्यू यॉर्क वर्ल्ड' मध्ये प्रकाशित.
 • १९६५ - दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित ’विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.
 • १९८६ - रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

सतरावे शतक

 • १६२० - विल्यम ब्रॅडफोर्ड आणि मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स प्लिमथमॅसेच्युसेट्स मध्ये प्लिमथ रॉक या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय.

विसावे शतक

 • १९१३ - आर्थर विनचे वर्ड क्रॉस, हे पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये प्रकाशित.
 • १९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत.
 • १९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रँक बॉर्मनजेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात.
 • १९७९ - ऱहोडेशियाच्या स्वातंत्र्यासाठीच्या ठरावाचा मसुदा लंडनमध्ये ठरला.
 • १९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.
 • १९८८ - लिब्यातील अतिरेक्यांनी पॅन ऍम फ्लाइट १०३ या बोईंग ७४७ जातीच्या विमानात लॉकरबी, स्कॉटलंड वर बॉम्बस्फोट घडविला. जमिनीवरील ११ सह २७० ठार.
 • १९९९ - स्पेनच्या नागरी रक्षकांनी ९५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली गाडी पकडली. तोरे पिकासो वरील हल्ला टळला.
 • २००१ - देशावरील आर्थिक संकट आणि शहरांमधील दंगलींना जबाबदार ठरवून आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो दे ला रुआची हकालपट्टी.

एकविसावे शतक

जन्म

 • १७९५ - लेओपोल्ड फॉन रांकजर्मन इतिहासकार.
 • १८०४ - बेंजामिन डिझरायेलीयुनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १८७९ - जोसेफ स्टालिन, १९२२ ते १९५३ पर्यंतसोवियेत युनियनचा नेता.
 • १९०३ - भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती.प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ), उद्योजक
 • १९२१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश
 • १९३२ - ज्ञानपीठविजेते लेखक यू.आर. अनंतमूर्ती
 • १९३२ - रेडिओ निवेदक अमीन सयानी
 • १९३५ - बालसाहित्यिक दत्ता टोळ
 • १९४२ - हू चिंताओचीनचे नागरी गणतंत्रचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५४ - क्रिस एव्हर्ट-लॉईड, ब्रिटीश टेनिस खेळाडू.
 • १९५९ - कृष्णम्माचारी श्रीकांत – धडाडीचे आघाडीचे फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे अध्यक्ष
 • १९६३ - सिनेअभिनेता गोविंदा
 • १९६७ - मिखाइल साकाश्विलि जॉर्जियाचा राष्ट्राध्यक्ष.

मृत्यू

 • १२९५ - प्रोव्हान्सची मार्गेरित बेरेन्जरफ्रांसचा राजा लुई नववा याची राणी.
 • १३०८ - हेसीचा हेन्री पहिला.
 • १८२४ - कंपवाताचा मानवी मेंदुशी संबंध आहे हे सिद्ध करणारे जेम्स पार्किन्सन
 • १९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती.
 • १९७९ - नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक
 • १९९३ - मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार
 • १९९७ - पं. प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक
 • १९९७ - निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ – भावगीतलेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
 • २००४ - औतारसिंग पेंटल भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञ.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search