ठळक घटना आणि घडामोडी

 • १९२१ - शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.
 • १९४० - हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमान कारखाना वालचंद हिराचंद यांनी म्हैसूर राज्यात सुरू केला.
 • १९७० - धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.
 • २००० - कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी
 • २००१ - बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.

सातवे शतक

 • ६१९ - बॉनिफेस पाचवा पोपपदी.

अठरावे शतक

 • १७८३ - जॉर्ज वॉशिंग्टनने काँटिनेंटल आर्मीचे सरसेनापतिपद सोडले.

एकोणिसावे शतक

 • १८८८ - व्हिंसेंट व्हॅन गोने आपल्या डाव्या कानाची पाळी कापून रेचेल नावाच्या नगरवधूला भेट दिली.

विसावे शतक

 • १९१३ - अमेरिकन अध्यक्ष वूड्रो विल्सनने फेडरल रिझर्व ऍक्टवर सही केली. फेडरल रिझर्व बँक अस्तित्त्वात.
 • १९१६ - पहिले महायुद्ध-मगधाबाची लढाई - दोस्त सैन्याने साइनाईईजिप्तमध्ये तुर्कीला पराभूत केले.
 • १९४० - हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना तत्कालिन म्हैसूर राज्यात बँगलोर येथे प्रसिद्ध उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी सुरू केला. 'हिंदुस्थान एअरक्रॉफ्ट लिमिटेड' कंपनीचे पुढे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नामांतर झाले.
 • १९४७ - बेल लॅबमध्ये प्रथमत: ट्रांझिस्टरचे प्रदर्शन.
 • १९५४ - डॉ.जोसेफ ई. मरेने बॉस्टनच्या पीटर बेन्ट ब्रिगहॅम हॉस्पिटलमध्ये पहिले मानव मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले.
 • १९७२ - निकाराग्वाची राजधानी मानाग्वामध्ये ६.५ रिश्टरचा भूकंप. १०,०००हून अधिक ठार.
 • १९७२ - उरुग्वेयन एर फोर्स फ्लाइट ५७१च्या उरलेल्या प्रवाशांना वाचविण्यात आले. अँडीझ पर्वतरांगेवर विमान कोसळल्यावर ७२ दिवस अतिउंच व अतिथंड परिस्थितीत राहताना जगण्यासाठी प्रवाश्यांनी नाईलाजाने मानवमांस खाल्ले. २ प्रवाश्यांनी १० दिवस अतिकठीण डोंगर पार करून काही प्रवासी जिवंत असल्याची माहिती दिली.
 • १९७९ - सोवियेत सैन्याने अफगाणिस्तानची राजधानी काबुल काबीज केले.

एकविसावे शतक

 • २००२ - इराकी मिग २५ प्रकारच्या विमानाने अमेरिकेचे एम.क्यू. १ प्रकारचे विमान पाडले. चालकविरहीत लढाऊ विमानाने द्वंद्व युद्धात भाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती.
 • २००४ - मॅकारी द्वीपांना रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.१ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का.
 • २००५ - अझरबैजान एरलाइन्स फ्लाइट २१७ हे बाकु हून अक्टाऊ शहराकडे जाणारे विमान उड्डाण केल्यावर लगेचच कोसळले. २३ ठार.
 • २००५ - डिसेंबर १८ला अड्रे शहरावर झालेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून चाडने सुदान विरुद्ध युद्ध पुकारले.

जन्म

 • १५३७ - योहान तिसरा, स्वीडनचा राजा.
 • १७७७ - झार अलेक्झांडर पहिलारशियाचा झार.
 • १८०५ - जोसेफ स्मिथ, जुनियरचर्च ऑफ जिझस क्राईस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स(मोर्मोन चर्च)चा संस्थापक.
 • १८४५ -- रासबिहारी घोष, प्रसिद्ध कायदेपंडित, देशभक्त. काँग्रेस पक्षाचे नेते आणि अध्यक्ष.
 • १८९७ - कविचंद्र कालिचरण पटनाईक – ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार
 • १९०२ - चौधरी चरण सिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ’लोकदल’ पक्षाचे संस्थापक
 • इ.स. १९०२ - चौधरी चरण सिंगभारताचे पाचवे पंतप्रधान.
 • १९१८ - हेल्मुट श्मिटजर्मनीचा चान्सेलर.
 • १९३३ - अकिहितोजपानचा सम्राट.

मृत्यू

 • १९२६ - स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या
 • १९६५ - गणपतराव बोडसमराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक
 • १९७९ - दत्ता कोरगावकर – हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार (याद, बडी माँ, दामन, नादान, रिश्ता, चंद्रराव मोरे, सुखाचा शोध, गीता, गोरखनाथ, गोरा कुंभार, सूनबाई, महात्मा विदूर, हरिहर भक्ती, रायगडचा बंदी)
 • १९९८ - रत्‍नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते, इचलकरंजीच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८५), खासदार (१९५२), आमदार (शिरोळ), महाराष्ट्र सरकारचे गहराज्य मंत्री, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य
 • २००० - ’मलिका-ए-तरन्नुम’ म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन
 • २००४ - पी. व्ही. नरसिंहरावभारतीय पंतप्रधान.
 • २००८ - गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक
 • २०१० - ज्ञानेश्वर नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक. त्यांचे ’पाऊस’, ’भरती’, ’चिद्‌घोष’,हे कथासंग्रह, ’दोन बहिणी’, ’ ’कोंडी’ या कादंबर्‍या व ’पिकासो’ हे चरित्र प्रसिद्ध आहे.
 • २०१० - के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक

प्रतिवार्षिक पालन

 • किसान दिन - भारत
 • वर्धापनदिन : विश्वभारती विद्यापीठ (शांतिनिकेतन)
वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita