ठळक घटना आणि घडामोडी

 • १८९८ - मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.
 • १९७६ - कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.
 • १९८२ - टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा ’मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.
 • १९९७ - विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार
 • २००४ - ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण झाली. या लाटेने भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात हाहा:कार माजवला. यात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पड्ले. त्यात एका धावत्या रेल्वेगाडीतील १७०० जणांचाही समावेश होता.

एकविसावे शतक

 • २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारतश्रीलंकाइंडोनेशियाथायलंडमलेशियामालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी.

जन्म

 • १८९९ - क्रांतिकारक उधम सिंग
 • १९१४ -.मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक
 • १९१४ - डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे.
 • १९१७ - प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक.त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यांच्या साहित्यामध्ये स्वप्‍नभंग, अनुक्षण, मेपल हे काव्यसंग्रह; एक तारा, दर्दके पाबंद इ. कादंबर्‍या; नाट्यचर्चा, समीक्षा की समीक्षा आदींचा समावेश आहे.
 • १९२५ - पं. कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक
 • १९३४ - समीक्षक व वाङ्मयाचे अभ्यासक द. दि. पुंडे
 • १९३५ - डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी).
 • १९४१ - लालन सारंग – रंगभूमीवरील कलाकार
 • १९४८ - डॉ. प्रकाश आमटे

मृत्यू

 • १९७२ - हॅरी ट्रुमन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
 • १९८९ - केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), ’चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ’शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक
 • १९९९ - शंकर दयाळ शर्मा, भारताचे राष्ट्रपती.भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती
 • २००० - प्रा. शंकर गोविंद साठे – नाटककार आणि साहित्यिक
 • २००६ - कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते
 • २०११ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री.

प्रतिवार्षिक पालन

 • ग्राहक दिन

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita