उठसुठ प्राचीन मंदिर दिसले की हेमाड पंथी म्हणण्याची परंपरा आपल्याकडे रुढ झाली आहे. मित्रहो महाराष्ट्र हे प्राचीन नागरी वस्ती असलेले स्थान आहे. महाराष्ट्रातील प्रमुख चार मोठ्या नद्यांचे खोरे या मुलस्थानाचे उगम आहेत...... तापती ( तापी ) आणि गोदावरीच्या खो-यात अनेक प्राचीन परंपराचे वाहक असलेल मंदिर आहेत. ज्या मंदिरांचा इतिहास दुस-या तिस-या शतकांचा आहे. मुळात यादवांचा काळ ११९० च्या पुढचा हेमाद्री पंडीत यांच्या पंतप्रधानकीचा ..... त्याकाळात या पट्यात अनेक स्थित्यंतरे झाली .... महसुली पद्दत बदली. शेतसारा आणि राजकीय कोषागाराची भाषा सर्वाना कळावी म्हणून मोडी ही लिपी हेमाद्री पंडीताना स्वतःच्या व्यासंगातून निर्माण केली. हेमाद्री पंडीत कट्टर धार्मिक असल्या कारणाने गावोगावी मंदिराचे निर्माण व्हावे म्हणून त्यानी स्वतःची अशी मंदिर रचनेची प्रदत्त शैली निर्माण केली, तो काळ १२ व्या शतकाचा होता. पुढे त्या शैलीत अनेक मंदिर तयार झाली. पण त्यापूर्वी वाकाटक , काकतीया ,चालुक्य ,राष्ट्रकुटाच्या साम्राज्यात अनेक मंदिराची निर्मिती झाली. त्या काळातील राज्य मंदिर निर्माण कोष वेगळा ठेवत असत. अगदी इ. स. दुस- या शतकापर्यंत ज्या शालीवाहनाची सत्ता होती ,त्यांच्या सत्ताकाळात मंदिर कोष निर्माण झाला. तो पुढे प्रत्येक साम्राज्याने कायम ठेवला. मात्र त्यांच्या बांधकाम शैलीत ठरावीकपणा नव्हता म्हणून त्या शैली काही प्रसिद्ध झाल्या नाहीत. १२ व्या शतकात मात्र हेमाद्री पंडीतांच्या काळात त्यांनी ही शैली निर्माण केली आणि त्याच्या शैलीचा शिक्का त्यापूर्वीच्याही मंदिर कलेवर पडला. कंधार तालुक्यात शेत नांगरताना एक मंदिर सापडले असल्याची बातमी वाचली आणि ते मंदिर प्राचीन असून हेमाडपंथी असल्याचा उल्लेख आहे. मंदिराच वय हे १२ व्या शतकाच्या पूर्वीचे असूनही आपण त्याला हेमाडपंथी म्हणतोय म्हणून हे लिहण्याचे प्रायोजन ...... इतिहासाची ही पान अंधळेपणानी चाळू नयेत म्हणूनही हा प्रपंच ......!!
- युवराज पाटील
https://www.facebook.com/ShivajiRaje.co.in/