१२/३०/२०१७

दिनविशेष डिसेंबर ३०


ठळक घटना व घडामोडी

एकोणिसावे शतक

 • १८०३ - अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह.
 • १८५३ - गाड्सडेन खरेदी - अमेरिकेने गिला नदीच्या दक्षिणेची व रियो ग्रान्देच्या पश्चिमेची ७७,००० वर्ग किलोमीटर जमीन मेक्सिकोकडून १,००,००,००० डॉलरच्या बदल्यात विकत घेतली.
 • १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - यु.एस.एस. मॉनिटर उत्तर कॅरोलिनातील केप हॅटेरास जवळ बुडाली.
 • १८८० - ट्रान्सवाल प्रजासत्ताक झाले. पॉल क्रुगर अध्यक्षपदी.
 • १८९६ - फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये होजे रिझालला फायरिंग स्क्वॉडने मृत्यूदंड. (पहा - रिझाल दिन).
 • १८९७ - नातालने झुलुलँड बळकाविले.

विसावे शतक

 • १९०३ - शिकागोच्या इरोक्वो थियेटरला आग. ६०० ठार.
 • १९२२ - सोवियेत संघराज्याची स्थापना.
 • १९२४ - एडविन हबलने जगात अनेक आकाशगंगा असल्याचा दावा सिद्ध केला.
 • १९२७ - एशियातील सगळ्यात जुनी भुयारी रेल्वे, गिंझा लाईन टोक्योमध्ये सुरू.
 • १९४० - कॅलिफोर्नियातील पहिला द्रुतगतीमार्गअरोयो सेको पार्कवे खुला.
 • १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला.
 • १९४४ - ग्रीसचा राजा जॉर्ज दुसर्‍याने राज्य सोडले.
 • १९४७ - रोमेनियाचा राजा मायकेलने राज्य सोडले.
 • १९५३ - जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संच अमेरिकेत विक्रीला. किंमत - १,१७५ डॉलर.
 • १९६५ - फर्डिनांड मार्कोस फिलिपाईन्सच्या अध्यक्षपदी.
 • १९७२ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेने उत्तर व्हियेतनामवरील बॉम्बफेक थांबविली.
 • १९९६ - आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार.
 • १९९७ - अल्जीरियात अतिरेक्यांनी चार गावातील ४०० लोकांना ठार मारले.

एकविसावे शतक

 • २००० - मनिलात काही तासात अनेक बॉम्बस्फोट. २२ ठार, १०० जखमी.
 • २००१ - आर्जेन्टिनात ब्युएनोस एर्सच्या रिपब्लिका क्रोमेन्योन नाईटक्लबमध्ये आग. १९४ ठार.
 • २००४ - भारत व एशियन गटाच्या देशांदरम्यान व्यापारी सहकार्य व शांततेचा करार.

जन्म

 • ३९ - टायटस, रोमन सम्राट.
 • १६७३ - तिसरा एहमेदऑट्टोमन सुलतान.
 • १८६५ - रुड्यार्ड किप्लिंगब्रिटीश लेखकमोगलीच्या कथाकुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले.मुंबईत जन्म.
 • १८७९ - रमण महर्षीभारतीय तत्त्वज्ञानी.
 • १८८४ - हिदेकी तोजोदुसर्‍या महायुद्धातील जपानी पंतप्रधान.
 • १८८७ - कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.'भारतीय विद्याभवन' चे संस्थापक.
 • १९०२ - डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार, वैदिक संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार
 • १९३५ - ओमार बॉन्गोगॅबनचा राष्ट्राध्यक्ष.

मृत्यू

 • १५९१ - पोप इनोसंट नववा.
 • १८९६ - होजे रिझालफिलिपाईन्सचा क्रांतिकारी.
 • १९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ.
 • १९७४ - शंकरराव देवभारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नेता व महात्मा गांधींचे सहकारी.
 • १९८२ - दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (सतीची पुण्याई, धाकटी मेहुणी, भक्त पुंडलिक, नसती उठाठेव, मुझे सीने से लगा लो, सतीचे वाण, थांब लक्ष्मी कुंकू लावते, वैशाख वणवा, सुभद्रा हरण, क्षण आला भाग्याचा, सप्तपदी इ. अनेक चित्रपट)
 • १९८६ - हॅरोल्ड मॅकमिलन, ब्रिटनचा पंतप्रधान.
 • १९८७ - दत्ता नाईक ऊर्फ ’एन. दत्ता’ – संगीतकार
 • १९९२ - शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर.
 • २००१ - हर्षद महेता, भारतीय शेरदलाल.
 • २००६ - इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्य्क्ष सद्दाम हुसेन यांना फाशी

प्रतिवार्षिक पालन

 • रिझाल दिन - फिलिपाईन्स.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search