१२/२०/२०१७

लेमन पुडिंगसाहित्य


·         २ चमचे लोणी
·         पाऊण वाटी साखर
·         १ मोठे लिंबू
·         १ कप दूध
·         २ अंडी
·         २ चमचे मैदा
·         चिमूटभर मीठ
पाककृती


·         अंड्यातले पिवळे व पांढरे वेगवेगळे करून वेगवेगळे फेटावे.
·         लिंबाची साल कापून किसून घ्यावी
·         लिंबाचा रस काढून वेगळा ठेवावा.
·         मैदा मीठ घालून चाळून घ्यावा.
·         लोणी व साखर एकत्र करून खूप फेटावे.
·         लोणी-साखरेच्या मिश्रणात चाळलेला मैदा, लिंबाच्या सालीचा कीस, लिंबाचा रस, अंड्यातला फेटलेला पिवळा भाग व दूध घालून मिश्रण चांगले घोटून घ्यावे.
·         अंड्यातला फेटलेला पांढरा भाग हळूहळू मिश्रणात घालून पुन्हा एकजीव होईपर्यंत घोटावे.
·         ओव्हनमध्ये ठेवण्यासाठी ओव्हनप्रूफ भांडे आतल्या बाजूने ग्रिसिंग करावे व त्यात हे मिश्रण ओतावे.
·         दुसऱ्या ट्रेमध्ये पाणी घालून त्यात मिश्रणाचे भांडे ठेवावे. ओव्हनमध्ये 180 डिग्रीला ३० ते ४० मिनिटे भाजावे. लज्जतदार पुडिंग तयार!


संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search