साहित्य
·
२ कप बेसन
·
६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
·
१ लहान चमचा लाल तिखट
·
मीठ चवीनुसार
·
२ मोठे चमचे तेल
·
पकोडे तळण्यासाठी वेगळं तेल
·
कढीसाठी साहित्य
·
५ कप आंबट दही
·
६ मोठे चमचे बेसन
·
१ लहान चमचा मोहरी
·
१/२ लहान चमचा हळदपूड
·
६ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या
·
१ इंच बारीक चिरलेला आल्याचा तुकडा
·
चिमूटभर हिंग
·
४ कप गरम पाणी
·
मीठ चवीनुसार
·
वरून फोडणीसाठी
·
१ लहान चमचा तेल
·
२ अख्ख्या लाल मिरच्या
पाककृती
·
कढी बनवण्यासाठी दह्यामध्ये बेसन व पाणी घालून हॅण्ड मिक्सरने
एकजीव करुन घ्या.
·
एका मोठ्या पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंगाची फोडणी घाला. मग त्यामध्ये आलं, हिरव्या मिरच्या आणि हळद घाला.
·
त्यानंतर दही-बेसनाचं मिश्रण आणि मीठ घाला. मोठ्या आचेवर मिश्रण
उकळा. मग आच कमी करा. जवळपास १५ मिनिटं मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
·
आता पकोड्यांसाठी बेसनमध्ये पाणी घालून घट्ट भजीसारखं पीठ तयार करा
आणि ते व्यवस्थित फेटा.
·
यामध्ये हिरव्या मिरच्या, लाल तिखट, मीठ आणि गरम तेल घाला. पुन्हा एकवार
फेटा. मग गरम तेलात याचे पकोडे तयार करा.
·
शिजलेल्या कढीमध्ये पकोडे टाका आणि ५ मिनिटं आणखी मंद आचेवर शिजू
द्या. यानंतर सर्व्हिंग बाऊलमध्ये कढी ओता.
·
एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये लाल मिरची परता आणि ही फोडणी कढीवर
ओता. वरून फोडणी घातल्यानंतर या पदार्थाला एक वेगळंच रूप मिळतं.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार