१२/०७/२०१७

मसाला इडली



साहित्य

·       २ वाट्या उकडा तांदूळ
·       १ वाटी उडीद डाळ
·       अर्धी वाटी चणा डाळ
·       पाव चमचा हिंग
·       १ चमचा काळी मिरी
·       १ टी. स्पून जीरे
·       थोडे आले किसून
·       थोडा कढीलिंब
·       थोडे काजूचे तुकडे
·       चवीनुसार मीठ
पाककृती

·       तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ रात्री भिजत घालावे.
·       सकाळी वाटून पीठ आंबायला ठेवावे.
·       पिठात जिरे व मिरे जाड कुटून, हिंग, मीठ घाला.
·       थोडे तेल गरम करुन काजू तुकडे व कढीलिंब तळून तेलासकट पिठात घाला.
·       आले किसून घालून पीठ खूप फेटावे.
·       पीठ फेटून इडली स्टॅंडवर इडल्या वाफवून घ्याव्यात.
·       चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.


संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search