ठळक घटना आणि घडामोडी

चौदावे शतक

 • १३९२ - जपानी सम्राट गो-कामेयामाने पदत्याग केला. गो-कोमात्सु सम्राटपदी.

पंधरावे शतक

 • १४९७ - वास्को द गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.

सतरावे शतक

 • १६३९ - इंग्लंडच्या संसदेने नागरी हक्कनामा प्रस्तुत केला.

अठरावे शतक

 • १७७३ - अमेरिकन क्रांती-बॉस्टन टी पार्टी - टी ऍक्टच्या विरोधात सन्स ऑफ लिबर्टीच्या सदस्यांनी मॉहॉक वेश धारण करून बॉस्टनच्या बंदरात चहाची खोकी फेकली.

एकोणिसावे शतक

 • १८३८ - ब्लड रिव्हरची लढाई - दक्षिण आफ्रिकेत क्वाझुलु, नाताल येथे ऍंड्रीझ प्रिटोरियसच्या नेतृत्त्वाखाली फूरट्रेक्कर आणि दाम्बुझा(न्झोबो) व न्देला कासोम्पिसी या झुलु ईम्पी सरदारांच्या सैन्यात घनघोर युद्ध. झुलुंच्या भाले आणि बाणांविरूद्ध बोअर बंदुका. तीन फूरट्रेक्कर जखमी ३,००० झुलु ठार.
 • १८६४ - अमेरिकन यादवी युद्ध - मेजर जनरल जॉर्ज एच. थॉमसच्या युनियन सैन्याने लेफ्टनंट जनरल जॉन बेल हूडच्या कॉन्फेडरेट आर्मी ऑफ टेनेसीला हरविले.

विसावे शतक

 • १९०३ - मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
 • १९२२ - वॉर्सोमध्ये पोलंडचा अध्यक्ष गेब्रियेल नारुतोविझचा खून.
 • १९३२ - ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
 • १९४२ - ज्यूंचे शिरकाण - हाईनरिक हिमलरने रोमा(जिप्सी) लोकांना कत्तलीसाठी ऑश्विझला पाठविले.
 • १९४४ - दुसरे महायुद्ध-बॅटल ऑफ द बल्ज - बेल्जियमच्या आर्देनेस प्रदेशात जनरल ड्वाइट डी. आयझेनहोवर आणि फील्ड मार्शल गेर्ड फोन रूंड्स्टेटच्या सैन्यात लढाई.
 • १९४६ - लेओन ब्लुम फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
 • १९४६ - थायलँडला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
 • १९५७ - ई.ई.चुंदरीगरने राजीनामा दिल्यावर सर फिरोजखान नून पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी.
 • १९७१ - भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती
 • १९६० - हिमवादळात न्यूयॉर्कच्या आयडलवाइल्ड विमानतळाजवळ युनायटेड एरलाइन्सचे डग्लस डी.सी.८ आणि ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सच्या सुपर कॉन्स्टेलेशन जातीच्या विमानांमध्ये स्टेटन आयलंडवर हवेत टक्कर. १३४ ठार.
 • १९७१ - बांगलादेश मुक्ति युद्ध - बांगलादेश विजय दिन. पाकिस्तानी फौजेने मित्रो बाहिनी समोर सपशेल शरणागति पत्करली.
 • १९८५ - कल्पक्‍कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर’ राष्ट्राला समर्पित
 • १९८९ - रोमेनियातील क्रांति - हंगेरीच्या पास्टर लास्लो तोकेसला देशनिकाल देण्याविरूद्ध तिमिसोआरा मध्ये नागरिकांनी सरकारचा निषेध केला.
 • १९९१ - पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
 • १९९८ - ऑपरेशन डेझर्ट फॉक्स - अमेरिका व युनायटेड किंग्डमने इराकवर बाँबफेक केली.

एकविसावे शतक

 • २०१२ - दिल्लीत एका तरुणीवर बसमध्ये निर्घृण सामूहिक बलात्कार व अत्याचार. तरुणीचा मृत्यू झाल्यावर सरकारने बलात्कार कायदा बदलला.
 • २०१४ - पाकिस्तानी तालिबानने पेशावरमधील एक लष्करी शाळेवर हल्ला चढवून १३२ विद्यार्थ्यांना ठार मारले.

जन्म

 • १४८५ - अरागॉनची कॅथेरीन, इंग्लंडची राणी.
 • १७७० - लुडविग फान बीथोव्हेन, जर्मन संगीतज्ञ.
 • १७७५ - जेन ऑस्टेनब्रिटीश लेखक.
 • १७९० - लिओपोल्ड पहिला, बेल्जियमचा राजा.
 • १८८२ - सर जॅक हॉब्सइंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८८८ - अलेक्झांडर, युगोस्लाव्हियाचा राजा.
 • १९१७ - सर आर्थर सी. क्लार्कब्रिटीश लेखक.
 • १९२६ : प्रहसन (फार्स) नाट्याभिनेता बबन प्रभू
 • १९३३ : लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे
 • १९५२ - जोएल गार्नरवेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

 • १५१५ - अफोन्सो दि आल्बुकर्क, पोर्तुगालचा भ्रमंत.
 • १९२२ - गेब्रियेल नारुतोविझपोलंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
 • १९६० : चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक
 • २००० : सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कसमधे काम करण्यास सुरूवात केली होती.
 • २००४ : लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता

प्रतिवार्षिक पालन

 • बहरैन - राष्ट्रीय दिन.
 • बांगलादेश - विजय दिन.
 • कझाकस्तान - स्वातंत्र्य दिन.
 • दक्षिण आफ्रिका - सामंजस्य दिन (पूर्वीचा शपथ दिन).

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita