शिवरायांची धोरणी नजर मावळातील एका कोणे एके काळापासुन उभ्या असलेल्या डोंगरावर पडली अन त्या पुराणपुरुषाच रुपांतर दुर्गपुरुषात झाल. तोच तो इतिहासाच्या पानापानांनी गौरवलेला गडांचा राजा आणि राजांचा गड-किल्ले राजगड!
गुंजवणी,कानद आणि नीरा नदीच्या बेचक्यातील गुंजण मावळातील हा डोंगर तापसांना फार आधीपासुन माहित असावा.ब्रम्हर्षी ऋषींच्या वास्तव्याच्या खुणा मिरवणारा हा डोंगर "बिरमदेवाचा डोंगर" ह्या नावाने मावळाला माहीत होता.यादव आणि बहमनी पुढे आदिलशाही-निजामशाही कालखंडामधे एक दुर्लक्षित ठाण एवढेच ’बिरमदेवगडाला’ मह्त्व होत. शिवरायांनी त्याचे तीन नद्यांनी वेढलेले लष्करीद्रुष्ट्या असलेल मह्त्वपुर्ण स्थान,तीन दिशांना असलेला विस्तार अचूक जाणून घेत त्याला तटबंदीचा साज चढवून डोंगरावर उभारलेल्या जगातील एका सर्वोत्क्रुष्ट राजधानीत रुपांतर केलं. राजगड हा एक आदर्श डोंगरी किल्ला आहे.घेरा-मेट-माची-बालेकिल्ला ही आदर्श डोंगरी किल्ल्याबाबतीत आढळणारी सर्व वैशिष्ट्ये राजगडासंदर्भात आढळतात.
https://www.facebook.com/ShivajiRaje.co.in