१२/१२/२०१७

व्हेज क्रिस्पी


साहित्य

·       १ मध्यम भोपळी मिरची, उभे काप करून
·       १ मध्यम गाजर, पातळ चकत्या
·       १०० ग्राम पनीर चे मोठे तुकडे
·       ४ ते ५ बेबी कॉर्न, तिरके जाडसर काप
·       १ लहान कांदा, मोठे तुकडे करावेत
·       कांदापात 2 काड्या
·       तळण्यासाठी तेल
·       १ टी स्पून तेल सॉस बनवण्यासाठी
·       २ टी स्पून लसूण पेस्ट
·       १ टी स्पून आले पेस्ट
·       २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
·       १ लहान कांदा, बारीक चिरून
·       १ टी स्पून टोमॅटो केचप
·       १/२ टी स्पून सोया सॉस
·       १ टी स्पून रेड चिली सॉस
·       १/४ कप पाणी
·       १/२ टी स्पून व्हिनेगर
·       १ टी स्पून कॉर्न फ्लोअर
·       १/४ टी स्पून मिरपूड
·       चवीपुरते मीठ
·       पिठासाठी
·       ४ टी स्पून मैदा
·       ६ टी स्पून कॉर्नफ्लोअर
·       १ टी स्पून लसूण पेस्ट
·       १/२ टी स्पून मीठ
·         चिमूट खायचा लाल रंग (किंवा गरजेनुसार)
·       २ चिमूट मिरपूड
पाककृती

·       पिठासाठी दिलेले सर्व साहित्य एका भांड्यात घालून मिक्स करावे. [मैदा, कॉर्नफ्लोअर, लसूण पेस्ट, मीठ, खायचा लाल रंग, मिरपूड]. थोडे पाणी घालून घट्टसर पेस्ट बनवून घ्यावी. यात भोपळी मिरची, गाजर, कांदा, आणि बेबीकॉर्न यांचे तुकडे घालून मिक्स करावे. सर्व भाज्या मिश्रणात व्यवस्थित घोळवाव्यात.
·       भाज्या गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्याव्यात. उरलेल्या मिश्रणात पनीरचे तुकडे घोळवून तेही  तळून घ्यावेत.
·       कढईत १ टी स्पून तेल गरम करावे. त्यात आले-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि मीठ घालावे. कांदा नीट परतावा.
·       नंतर टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, आणि १/४ कप पाणी घालावे. नीट ढवळावे. लागल्यास थोडे मीठ घालावे.
लहान वाटीत २ टी स्पून पाणी आणि १ टीस्पून कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करावे. कढईत घालून थोडे घट्टसर होवू द्यावे. मिनिटभर ढवळावे. त्यात व्हिनेगर घालावे.

·       आता यात तळलेल्या भाज्या आणि पनीर घालून १५-२० सेकंदच मिक्स करावे. वरून थोडी मिरपूड घालावी.
·       वरून चिरलेली कांद्याची पात घालून सर्व्ह करावे.संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search