१२/०४/२०१७

द ग्रेट वॉल !


द ग्रेट वॉल !
'द ग्रेट वॉल' म्हणून ओळखली जाणारी चीनची भिंत २,२०० वर्षांपूर्वी बनवली गेली असली तरी आजही तिचं रहस्य कायम आहे. आत्तापर्यंत या भिंतीची लांबी ८,८५१.८ किलोमीटर इतकी ही भिंत लांब असल्याचं म्हटलं जात होतं. पण नुकत्याच झालेल्या एका अभ्यासामध्ये ही भिंत त्याच्यापेक्षाही २.४ पट मोठी असल्याचं म्हटलंय.
अनेक वास्तुकारांनी आत्तापर्यंत या भिंतीच्या ४३,७२१ भागांची माहिती मिळवली आहे. त्यांच्या मते, या संपूर्ण भिंतीची लांबा एकूण २१,१९६.१८ किलोमीटर इतकी मोठी असू शकते. हे नवं सर्वेक्षण चीनच्या ‘स्टेट ऐडमिनिस्ट्रेशन ऑफ कल्चरल हेरिटेज’मधून प्रकाशित करण्यात आलंय. ग्रेट वॉलच्या संरक्षणासाठी बनवल्या गेलेल्या ‘चायना ग्रेटवॉल सोसायटी’ या एका बिनसरकारी संस्थेचे अध्यक्ष यान जियामिन यांच्या म्हणण्यानुसार, ही ग्रेट वॉल मिंग वंश (१३६८-१६४४) दरम्यान बनवली गेली होती असा अनुमान पहिल्या अभ्यासात काढण्यात आला होता. पण त्यानंतर केल्या गेलेल्या अभ्यासात ही भिंत अनेक वंशांच्या शासनकाळात निर्माण करण्यात आलीय, असं सिद्ध झालं.

सगळ्यात मोठी मानवनिर्मित भिंत म्हणून या वास्तूचा आजही जगभरात दबदबा कायम आहे. मात्र या चर्चेनंतर चीनच्या भिंतीची नेमकी लांबी किती? हा प्रश्न सगळ्यांनाच पडणार आहे.
- Info Courtesy Zee Media
https://www.facebook.com/Amhichtevede

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search