"1930 च्या नंतर सामान्य जीवन जगणारा व्यक्ती अचानक राष्ट्रपुरुष बनला गेला .आक्रामक भाषा , जाज्वल देशभक्ती , प्रखर ज्यु विरोध , जर्मनीला महासत्ता बनवण्याची महत्वकांक्षा,अल्पावधीतच जर्मन लोकांनी त्याला देशाच्या सर्वोच्च स्थानावर पोहचवले .
त्या काळात संपुर्ण जर्मनीत प्रखर देशभक्तीचे वारे वाहत होते आपल्या भाषणाने हिटलर करोडो लोकांना जिंकत असे ,थेट भावनेला हात घालत जगजेत्ता बनण्याची त्याची ईच्छा त्याने हळुहळु बहुसंख्य जर्मन लोकात निर्माण केली . भावनिक आवाहन करत लाखो लोकांची मने तो जिंकत असे . जर्मनीच्या प्रखर राष्ट्रवादाचे प्रतीक म्हणुन जर्मन लोकांनी विशेषत: तरुणांनी हिटलरला डोक्यावर घेतल .
जोपर्यत जर्मन सैनिक जिंकत गेले तोपर्यत हिटलरविरोधी बोलणारा माणुस देशद्रोही समजला जाई . मोठया मोठया स्टेडियमवर हिटलरच्या सभा होत . जर्मनीने प्रचंड वेगाने नाझीवाद पसरत होता . " जर्मन लोक शुध्द नाँर्डीक वंशाचे आहेत म्हणुन जगावर राज्य करण्याचा आम्हाला जन्मजात हक्क आहे " असे हिटलर कायम सांगत असते .जोपर्यत हिटलर जगावर भारी पडत होता जिंकत होता तोपर्यत बहुतांश जर्मन लोक हिटलरच्या सोबत होते . हिटलर लोकप्रिय नेता ते लष्करी हुकुमशहा म्हणुन प्रस्थापित होत होता .
मात्र जेव्हा दुसऱ्या महायुध्दाचे पारडे फिरले आणि लाखो जर्मन सैन्य मारले गेले . हिटलरला पराभव दिसु लागला .त्याच्या चुकीच्या धोरणाची किंमत रक्ताने चुकवायची वेळ सुरु झाली . जर्मनी देशाच्या अस्तीत्वावरच प्रश्नचिन्ह लागु लागले तेव्हा ....
तेव्हा हिटरला नालायक म्हणनारी पिढी जर्मनीत वेगाने पुढे आली . आज जर्मनीत हिटलरची प्रतिमा एक माथेफेरु , राक्षसी महत्वकांक्षा असणारा लष्करी हुकुमशाहा एवढीच शिल्लक आहे .
विशेषत: हिटलरने कोणताही भ्रष्टाचार म करताही जर्मनीच्या कैक पिढया अंधारात ढकलल्या
तेही प्रखर राष्ट्रवाद , देशभक्ती याच्या नावावर ! "
तेही प्रखर राष्ट्रवाद , देशभक्ती याच्या नावावर ! "
----इतिहास पुन्हा पुन्हा घडतो म्हणतात कदाचित फक्त ठीकाण व नावे बदलत असतात .
...म्हणुन वेळ प्रत्येकाचा हिशोब करते तेव्हा कोणी गर्वात राहु नये
https://www.facebook.com/rahul.aher?hc_ref=ART2kYYj6osc0sP-jXwxSmG-3oy5tbbd1wCoruz-EJyjuhbjutytsQO6Q-UmB_M2Hfw&fref=nf