१२/०८/२०१७

वेरूळचे कैलास मंदीरवेरूळचे कैलास मंदीर, .जगातील "एकमेव" मंदीर आहे..आधी कळस.. मग पाया
जे संपूर्ण दगडात कळसापासून पायापर्यंत कोरून बनवलेले आहे
कैलास हे एकमेव मंदिर असे नाही की जे कळसापासून पाया पर्यंत कोरले गेले. भारतात असे अनेक प्रयत्न झाले. याचे वैशिष्ट्य असे की त्या मालिकेतले हे सर्वात मोठे मंदिर आहे आणि ते पूर्णत्वालाही गेले. अजिंठा येथील लेणी ज्या चित्रकला व शिल्पकला यांमुळे जगप्रसिद्ध आहेत त्याच कारणांमुळे वेरूळ येथील लेणीदेखील प्रसिद्ध असून, त्यास मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली ती येथील ‘आधी कळस मग पाया’ ही नवी म्हण निर्माण करणार्‍या ‘कैलास मंदिरामुळे’. औरंगाबादपासून वायव्येस सुमारे २१ कि.मी. अंतरावर बालाघाटाच्या डोंगरात वेरूळच्या लेणी वसलेल्या आहेत. पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या कैलास लेण्यांचा जिर्णोद्धार करून तेथील पूजाअर्चेसाठी वर्षासन बांधून दिले


१६ व्या क्रमांकाचे लेणे हे ‘कैलास लेणे’ या नावाने जगप्रसिद्ध आहे. कारण याच कैलास मंदिरामुळे ‘आधी कळस, मग पाया’ ही नवी म्हण निर्माण झाली आहे असे म्हणता येईल. कारण, कोणतीही वास्तू उभी करतांना त्या वास्तूचा पाया आधी तयार होतो व मग त्यावर सर्वांत शेवटी कळस चढवला जातो. पण हे कैलास मंदिर मात्र त्या तत्त्वाला अपवाद ठरले आहे. हे संपूर्ण मंदिर एकाच-एकसंघ अशा-दगडात कोरलेले आहे. या मंदिराभोवती दगडांची नैसर्गिक भिंत आहे. त्यावर विविध प्रकारची अर्धस्तंभांनी विभागलेली देवकोष्टे आहेत. ६०x३० चौ. मी. च्या पहाडातून अगदी मध्यभागी या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे. मंदिराची शिल्पशैली द्रविड पद्धतीची आहे. मंदिराच्या भोवती पाच लहान लहान मंदिरे असून समोर नंदीमंडप आहे. हे मंदिर एका उंच अशा जोत्यावर उभे असून त्या जोत्यावरच हत्ती, सिंह हे प्राणी कोरलेले आहेत. दूरून या मंदिराकडे पाहिले तर हे हत्ती, सिंह या मंदिराला आपल्या पाठीवर उचलून धरत आहेत असे वाटते. कैलास पर्वत उचलणार्‍या रावणाची बरीच शिल्पे या वेरूळच्या लेण्यांमध्ये आढळतात. पण या सर्वात कैलास मंदिरातील शिल्प उत्कृष्ट आहे. याशिवाय गंगा, यमुना, सारीपाट खेळणारे शिव-पार्वती, कार्तिकस्वामी, गणेश, नटराज यांचीही शिल्पे येथे पाहण्यास मिळतात. या हिंदू लेणींमध्ये शैव-वैष्णव असा भेदभाव फारसा दिसत नाही. जवळ जवळ दीडशे वर्ष (१० पिढ्या) इथे काम सुरु होते तरीही यात एकही चूक कोणत्याही कलाकाराच्या हातून झालेली आढळत नाही.
https://www.facebook.com/ShivajiRaje.co.in/?ref=py_c

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search