१२/१५/२०१७

दिनविशेष डिसेंबर ९


ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक

 • १७९३ - अमेरिकन मिनर्व्हान्यूयॉर्कचे पहिले दैनिक प्रकाशित.

एकोणिसावे शतक

 • १८२४ - अयाकुशोची लढाई - ऍंतोनियो होजे दी सुकरच्या नेतृत्त्वाखाली पेरूच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्पॅनिश दलाला हरवून पेरू स्वतंत्र केले.
 • १८३५ - टेक्सासच्या गणराज्याने सान ऍंतोनियो जिंकले.
 • १८५६ - ईराणमधील बुशहरने ब्रिटीश लश्करासमोर शरणागति पत्करली.
 • १८८८ - अमेरिकन युद्ध खात्यात काम करणाऱया हर्मन हॉलेरिथने स्वत: तयार केलेले गणकयंत्र वापरण्यास सुरूवात केली.

विसावे शतक

 • १९४० - दुसरे महायुद्ध - रिचर्ड ओ'कॉनोरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय व ब्रिटीश सैनिकांनी ईजिप्तच्या सिद बरानीतील ईटालियन सैन्यावर हल्ला केला.
 • १९४१ - दुसरे महायुद्ध - चीनी गणराज्य, कोरियन गणराज्याचे तात्पुरते सरकार व क्युबाने जर्मनी व जपान विरूद्ध युद्ध पुकारले.
 • १९४५ - जनरल पॅटन जर्मनीमध्ये अपघातात जखमी.
 • १९४६ - न्युरेम्बर्ग खटला सुरू.
 • १९६१ - टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
 • १९९० - लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.

जन्म

 • १४४७ - चेंगह्वाचीनी सम्राट.
 • १५०८ - गेम्मा फ्रिसियसडच गणितज्ञ व नकाशेतज्ञ.
 • १५९४ - गुस्तावस अडोल्फस, स्वीडनचा राजा.
 • १६०८ - जॉन मिल्टनइंग्लिश कवी.
 • १९१९ई.के. नयनारकेरळचा मुख्यमंत्री.
 • १९२३ - बॉब हॉकऑस्ट्रेलियाचा तेविसावा पंतप्रधान.
 • १९४६ - सोनिया गांधीइटलीत जन्मलेली भारतीय राजकारणी.

मृत्यू

 • ११६५ - माल्कम चौथा, स्कॉटलंडचा राजा.
 • १४३७ - सिगिस्मंड, पवित्र रोमन सम्राट.
 • १५६५ - पोप पायस चौथा.
 • १६६९ - पोप क्लेमेंट नववा.
 • १७०६ - पेद्रो दुसरा, पोर्तुगालचा राजा.

प्रतिवार्षिक पालन

 • टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) - स्वातंत्र्य दिन

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search