१२/१४/२०१७

कराड येथील आगाशिव लेणी


सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात कराडच्या ईशान्येस ३ ते ४ कि.मी. अंतरावर आगाशिव डोंगर आहे.डोंगर माथ्यावर शिवालयातील शंकराचे आगाशिव असे नाव आहे. त्यावरूनच हे नाव पडले आहे. डोंगरमाथा सुमारे ४०० मीटर उंचीवर आहे.
या गटात लहानमोठ्या ६३ लेण्या आहेत त्यापैकी कोयना नदीच्या बाजूला तर उरलेल्या जखिणवाडीकडे (यक्षिण वाटिका हे मूळ गाव)बाजूस आहे
इ.स.पू . २५० ते इ.स.२०० अशा ४५० वर्षांच्या काळात टप्याटप्याने ह्या हीनयान पंथीयांची लेणी खोदली गेली. चक्र आणि सिंह ही प्रतीके येथे कोरलेली आढळतात.

गुफा चे विशेष
गुफा क्र.१.चोखमेळा गुफा ह्या विहार गुफेच्या प्रवेशमंडपाच्या स्तंभावर शिल्पकाम आहे ते महाडजवळील पाले लेण्यांशी सामर्थ्य दर्शविते
गुफा क्र.४.लक्ष्मीची वाडी येथे विहाराच्या मुख्य सभामंडप व दोन खोल्या आहेत
गुफा क्र.५.चैत्य मंदिराच्या अर्धवर्तुळाकार छताची उभारणी लक्षणीय आहे
गुफा क्र.१६.स्तूपयुक्त उपासना मंदिर
गुफा क्र २४. विशेष शिल्पकाम तीन बाजूला ४ छोट्या खोल्या ,दगडी जाळ्या वैशिष्ट्य
गुफा क्र ४७.मुख्य सभागृह गोपालपुत्र संघमित्राची देणगी अशा अर्थाचा शिलालेख
गुफा क्र ४८.चैत्यमंदिरातील स्तूपाजवळ शिल्पकृती
गुफा क्र६२. विहार गुफा ३ अंगांना मिळून१७ खोल्या खोदल्या आहेत
आगाशिव डोंगरात ६३ लेण्यांचा समूह जखिणवाडीच्या दक्षिणेकडे२३,नैऋत्येस १९, उत्तरेस २२ लेणी आहेत. परंतु आगाशिव महात्म्य यात ८० ते १०८ लेणी आहेत असा संदर्भ कऱ्हाड ह्या १९२९ च्या यशवंत गुप्ते याच्या पुस्तकात आहे.
पाहणीतून काही बुजलेल्या बौद्ध लेणी ,चैत्य व विहार असल्याचे आढळून येते.
https://www.facebook.com/ShivajiRaje.co.in

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search