१२/०९/२०१७

मेथी मटार मलाई
साहित्य

·       १ वाटी हिरवे मटार
·       १ मेथीची जुडी
·       ४ हिरवी मिरच्या
·       एक टोमॅटो
·       २ चमचे साखर
·       २ चमचे क्रीम
·       १ कप दूध
·       थोडी हळद
·       थोडा गरम मसाला
·       १२ ते १५ काजू
·       १०० ग्रॅम खवा
·       पाव वाटी खरबूज बी
·       ४ चमचे तेल
·       ४ लवंग
·       ४ छोटे वेलदोडे
·       ४ काळे मिरे
·       २ तमालपत्र
·       २ चमचे आले लसणाची पेस्ट
पाककृती

·       काजू आणि खरबूज बी एक तास गरम पाण्यात भिजवावे. नंतर मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक पेस्ट करावी.
·       मटार उकडून घ्यावेत. मेथी साफ करून निवडून त्याला मीठ लावून १० मिनिटे ठेवावे. १० मिनिटांनी सुटलेले पाणी काढून टाकावे.
·       कढईत तेल टाकून लवंग, वेलदोडे, तमालपत्र, काळीमिरी आणि आले-लसणाची पेस्ट टाकून परतावे. यात १०० ग्रॅम खवा टाकून व्यवस्थित मिक्स करावे.
·       एक ग्लास पाणी, काजू-खरबूज पेस्ट आणि एक कप दूध घालावे.
·       १०-१५ मिनिटे सतत हलवत शिजवावे म्हणजे मिश्रण फाटणार नाही.
·       चांगले उकळ्ल्यावर चवीनुसार त्यात मीठ टाकावे. मंद आचेवर अर्धा तास शिजवावे. काजू ग्रेवी तयार होईल.
·       पुन्हा कढईत तेल गरम करून त्यात जिरं, हळद, टोमॅटो पेस्ट, थोडा गरम मसाला, मटार, मेथी घालून हलवावे.
·       या मिश्रणात काजू ग्रेव्ही घालून ५-१० मिनिटे शिजवावे.
·       दोन चमचे क्रीम घालावे.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search