ठळक घटना

पहिले शतक

 • ४९ - ज्युलियस सीझरने रुबिकोन नदी ओलांडली. इटलीतील गृहयुद्ध सुरू.

तिसरे शतक

 • २३६ - संत फाबियान पोपपदी.

अठरावे शतक

 • १७३० - पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.

एकोणिसावे शतक

 • १८०६ - बोअर युद्ध - केप टाउनच्या डच वसाहतीने ब्रिटीश सैन्यासमोर शरणागती पत्करली.
 • १८१० - नेपोलियन बोनापार्ट व जोसेफिन दि बोहार्नेचे लग्न मोडले.
 • १८११ - लुईझियानातील दोन पॅरिशमध्ये(जिल्हे) गुलामांचा उठाव.
 • १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - फ्लोरिडा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातून विभक्त झाले.
 • १८६३ - लंडनमधील भुयारी रेल्वे पॅडिंग्टन व फॅरिंग्डन स्ट्रीट या स्थानकांमध्ये सुरू.
 • १८७० - बॉम्बे, बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B. B. C. I. Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीचे चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.

विसावे शतक

 • १९०१ - बोमोन्ट, टेक्सास जवळ खनिज तेल सापडले.
 • १९२० - लीग ऑफ नेशन्सने आपल्या पहिल्या बैठकीत व्हर्सायच्या तहाला मान्यता दिली.
 • १९२३ - लिथुएनियाने मेमेल बळकावले.
 • १९२६ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
 • १९२९ - टिनटिनची चित्रकथा पहिल्यांदा प्रकाशित.
 • १९४६ - लंडनमध्ये संयुक्त राष्ट्रांचीची पहिली सर्वसाधारण सभा. ५१ राष्ट्रे उपस्थित.
 • १९५७ - हॅरोल्ड मॅकमिलन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
 • १९६६ - भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
 • १९७२ - शेख मुजीबुर रेहमान हे पाकिस्तानच्या कारावासातून ९ महिन्यानंतर सुटून बांगलादेश मध्ये नवीन राष्ट्रपती म्हणून परतले.
 • १९८९ - क्युबाने अँगोलातून सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.

एकविसावे शतक

 • २००१ - विकिपिडीया न्यूपिडीयाचा एक भाग म्हणून सुरू झाला. पाच दिवसांनी त्याचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण झाले.

जन्म

 • १७७५ - दुसरे बाजीराव पेशवे.
 • १८१५ - सर जॉन अलेक्झांडर मॅकडोनाल्डकॅनडाचा पहिला पंतप्रधान.
 • १८६९ - ग्रिगोरी रास्पुतिन, रशियन सन्यासी, राजकारणी.
 • १८७१ - ज्यो ट्रॅव्हर्सऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १८९६ - काकासाहेब तथा नरहर विष्णु गाडगीळ, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता.
 • १९०० - मारोतराव सांबशिव कन्नमवारमहाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३)
 • १९०१ - डॉ. गणेश हरी खरे, इतिहास संशोधक.
 • १९०२ - शिवराम कारंथ, कन्नड साहित्यिक.
 • १९०३ - पड थर्लोऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९१३ - गुस्ताव हुसाकचेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९१७ - टायरेल जॉन्सनवेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
 • १९१८ - आर्थर चुंगगुयानाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९२७ - शिवाजी गणेशनतमिळ चित्रपट अभिनेता.
 • १९३३ - लेन कोल्डवेलइंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९३८ - डोनाल्ड क्नुथ, अमेरिकन गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.
 • १९४० - येशु दास, भारतीय पार्श्वगायक.
 • १९७४ - ॠतिक रोशनभारतीय चित्रपट अभिनेता.
 • १९७५ - जेम्स कर्टलीइंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९८१ - जेहान मुबारकश्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

 • ६८१ - पोप अगाथो.
 • १०९४ - खलिफा अल् मुस्तान्सर.
 • १२७६ - पोप ग्रेगोरी दहावा.
 • १७६० - दत्ताजी शिंदेपानिपतच्या पहिल्या युद्धातील मराठा सरदार.
 • १८६२ - सॅम्युएल कोल्ट, अमेरिकन संशोधक.
 • १९१७ - बफेलो बिल कोडी, अमेरिकन साहसवीर.
 • १९२२ - ओकुमा शिगेनोबुजपानाचा आठवा पंतप्रधान.
 • १९६६ - लालबहादूर शास्त्रीभारताचे पंतप्रधान.
 • १९९९ - आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी विचारवंत.
 • २००२ - पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी.आर. व्यास, ख्यालगायकव बंदिशकार.

प्रतिवार्षिक पालन

 • मार्गारेट थॅचर दिन - फॉकलंड द्वीप.

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita