१/०६/२०१८

दिनविशेष जानेवारी ६ठळक घटना आणि घडामोडी


सतरावे शतक

 • १६६४ - मराठी सैन्य सुरतेत शिरले.
 • १६६५ - शिवाजी महाराजांनी महाबळेश्वर येथे जिजाबाई व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.
 • १६७३ - कोंडाजी फर्जंद यांनी ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकला.


एकोणिसावे शतक

 • १८३२ - मुंबई येथे 'दर्पण' चा पहिला अंक प्रदर्शित.- संपादक बाळशास्त्री जांभेकर.
 • १८३८ - सॅम्युएल मॉर्सने तारयंत्राचा शोध लावला.

विसावे शतक]

 • १९२४ - वि.दा. सावरकर यांची अंदमानच्या तुरुंगातून  जन्मठेपेतून सुटका.
 • १९२९ - मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.


जन्म

 • १७४५ - ऐलियन माँटगोल्फिएर बलूनच्या साहाय्याने आकाशात जाण्याचे प्रयोग करणारा.
 • १८१२ - बाळशास्त्री जांभेकर – दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचे आणि दिग्दर्शन या मासिकाचे प्रकाशक.
 • १८६८ - गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज.
 • १९२५ - रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक
 • १९३१ - डॉ. आर.डी. देशपांडे – पर्यावरणशास्त्रज्ञ, महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे (आघारकर संशोधन संस्था) अध्यक्ष.
 • १९५९ - कपिलदेव निखंजभारतीय क्रिकेट खेळाडू. भारतीय क्रिकेट संघनायक, समालोचक व प्रशिक्षक.
 • १९६६ - ए.आर. रहमान, भारतीय संगीतकार.

मृत्यू

 • १७९६ - जिवबा दादा बक्षीमहादजी शिंदे यांचे सेनापती, मुत्सद्दी.
 • १८४७ - त्यागराज, दाक्षिणात्य संगीतकार
 • १८८५ - भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक, १८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात ’भारतेंदू काळ’ म्हणून ओळखला जातो.
 • १९१९ - थियोडोर रूझवेल्ट अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष.
 • १९७१ - प्रफुल्लचंद्र तथा पी.सी. सरकार, भारतीय जादूगार.
 • १९८४ - विद्यानिधी महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार.
 • २०१० - प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे, लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक

प्रतिवार्षिक पालन

 • पत्रकार दिन

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search