२/०६/२०१८

स्वादिष्ट सांबार चा संभाजीमय इतिहास !
संभाजी महाराज आणि दक्षिण भारताची चविष्ट डिश सांबार चा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
पण भारतभर चवीने वरपल्या जाणार्या या सांबार चा शोध संभाजी महाराजांमुळे लागला.
झाले असे की संभाजी महाराज तंजावर येथे आपले चुलतबंधू शाहूजी (पहिले) यांच्या भेटीस गेले होते.शाही मुपादकखान्यात आमटी बनवत असताना स्वैपाक्याच्या लक्षात आले की कोकम संपले आहे.त्या काळी कोकम हे महाराष्ट्रातून तंजावर ला पुरवले जात असे.
ही अड़चण निर्माण झाल्याने आमटी कशी करावी हा प्रश्न पडला तेव्हा संभाजी महाराजांनी कोकम ऐवजी चिंच वापरा असा सल्ला स्वैपाक्या ला दिला आणि त्याने तो ऐकला. यातून जी ही पाककृती तयार झाली ती संभाजी महाराजांना प्रचंड आवडली इतकेच नाही तर अल्पवधित सम्पूर्ण तंजावर मध्ये प्रसिद्ध झाली.त्यामुळे शाहूजी महाराजांनी याचे नाव 'सांभार' (म्हणजेच संभा चा आहार) असे ठेवले.
नंतर सम्पूर्ण भारतात ते सांभार,सांबार, सांबर नावानी प्रसिध्ह झाले.
पुढच्या वेळी इडली सांबार खाताना संभाजी महाराजांची आठवण काढायला विसरु नका !!!

Above Information Authenticated by -

Dr.S Suresh (Historian, INTACH)
Dr.Nanditha Krushna ( Historian,Ph.D.Indian Culture )
Padmini Natrajan (Food Researcher and Famous Blogger)
Spershita Saxena (NDTV Chef)


https://www.facebook.com/Amhichtevede/

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search