कुणाच्या येण्याने मन प्रसन्न होणार असेल तर तू याव
कुणाच्या जाण्याने निसर्ग सवत्र हिरवगार होणार असेल तर तू जावं
कुणाच्या नाचण्याने आभाळात गडबड होणार असेल तर तू नाचावं
कुणाच्या बरसण्याने चिखलात कमळ फुलणार असेल तर तू बरसाव
कुणाच्या रागावण्याने नद्यांना पूर येणार असेल तर तू रागवावं
कुणाच्या लाजण्याने आभाळात सप्तरंग दिसणार असेल तर तू लाजावं
अन कुणाच्या तरी आठवणीत कविता सुचणार असेल तर ते तूच असाव