८/२९/२०१८

आवळ्याचे लोणचे
लागणारे साहित्य:

आवळे  पातळ आणि उभ्या फोडी करून दीड वाट्या,लाल मोहरी - पाव वाटी,फोडणीसाठी तेल अर्धी वाटी,काळी मोहरी ,पाव चमचा हिंग ,अर्धा चमचा,हळद अर्धा चमचा, मेथ्या अर्धा चमचा,मीठ आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे पाव वाटी 


कसे तयार कराल:

आधी छोट्या कढईत मेथ्या किंचीत तेलावर तळून घेऊन बाजूला ठेवा.आता बाकी तेल घेऊन चांगल्यापैकी तापवून काळी मोहरी, हिंग आणि हळद घालून फोडणी देऊन ठेवा.आवळे स्वच्छ धुवून त्याच्या अगदी पातळ आणि उभ्या फोडी करून घ्या(आवळे किसून घेतले तरी चालतात). त्यावर लगेच मीठ घालून चांगले कालवून घ्या, त्यामुळे आवळे काळे पडणार नाहीत.आपण जर हिरवी मिरची वापरणार असाल तर छोटे तुकडे आवळ्याच्या फोडींबरोबर एकत्र कालवून ठेवा.आता  मिक्सरच्या छोट्या भांड्यात लाल मोहरी आणि तळलेल्या मेथ्या घेऊन त्याची पावडर करून घ्या. मग त्यात पाव वाटी पाणी घालून चांगले वाटून घ्या.ही मोहरी आवळ्याच्या तुकड्यांच्यात नीट कालवून घ्या.
आता पर्यंत करून ठेवलेली फोडणी थंड झाली असेल, तीही ह्या आवळ्यांच्यात घालून व्यवस्थित कालवून घ्या.
आणि त्यात चवीनुसार मीठ घाला आणि  लोणचे तयार आहे.


संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवारWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search