नमस्कार मित्र आणि मैत्रिनींनो,
एकेकाळी हौशी रंगभूमीचं हक्कच स्थान हे गणेशोत्सवातल्या मंडपात होतं. काळ बदलत गेला, आणि हि जागा कायमची निसटून गेली. परंतु हौशी रंगभूमीची ज्योत हि आजही काही रंगकर्मी पेटवत ठेवत आहेत.
परदेशात कलाकारांना जपलं जातं, तर आपल्याकडे वाऱ्यावर सोडलं जातं. पण तरी रंगकर्मी आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांच्या जोरावर लढत राहतात आणि आपलं मनोरंजन करत राहतात. अर्थात हाच तर रंगकर्मींचा खरा धर्म असतो. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणे.
आणि म्हणूनच आता ह्या रंगकर्मींनी पुन्हा आपल्या हक्कच स्थान प्राप्त केलं पाहिजे, अशी अपेक्षा मनात निर्माण झाली आणि कोणीतरी सुरुवात करावी ह्यासाठी पाहिलं पाउल टाकतोय. आणि म्हणून हा खटाटोप. परंतु ते आपल्या सर्वांशिवाय शक्य नाही. म्हणून आम्ही दोन हौशी संस्था एकत्र येऊन हि चळवळ पुन्हा एकदा सुरू करण्याचं धाडस करतोय. सगळे युवक आहोत. आणि हि चळवळ सुरू करतोय. हि चळवळच हेतू हा, प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन होय. पण त्याला साथ हवी आपल्या सारख्या रसिक प्रेक्षकांची.
म्हणून आपल्या गणेश मंडपात एक दिवस तरी ह्या हौशी रंगभूमीला स्थान द्यावं हि नम्र विनंती.
शेवटी उत्सवातून संस्कृती आणि परंपरा हि जपली गेली पाहिजे. हीच तर अपेक्षा फक्त महाराष्ट्रीयच न्हवे तर भारतीय उत्सवाची हि आहे.
धन्यवाद !!!
रोहित सुर्वे
संस्थापक - टिम आर - ठाणे.
संस्थापक - कला प्रयोग प्रस्तुत.
व्हाट्सअप. ९९६७६६३६३०.