८/३०/२०१८

कढी पकोडासाहित्य

·       २ कप बेसन
·       ६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
·       १ लहान चमचा लाल तिखट
·       मीठ चवीनुसार
·       २ मोठे चमचे तेल
·       पकोडे तळण्यासाठी वेगळं तेल
·       कढीसाठी साहित्य
·       ५ कप आंबट दही
·       ६ मोठे चमचे बेसन
·       १ लहान चमचा मोहरी
·       १/२ लहान चमचा हळदपूड
·       ६ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या
·       १ इंच बारीक चिरलेला आल्याचा तुकडा
·       चिमूटभर हिंग
·       ४ कप गरम पाणी
·       मीठ चवीनुसार
·       वरून फोडणीसाठी
·       १ लहान चमचा तेल
·       २ अख्ख्या लाल मिरच्या
पाककृती

·       कढी बनवण्यासाठी दह्यामध्ये बेसन व पाणी घालून हॅण्ड मिक्सरने एकजीव करुन घ्या.
·       एका मोठ्या पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंगाची फोडणी घाला. मग त्यामध्ये आलं, हिरव्या मिरच्या आणि हळद घाला.
·       त्यानंतर दही-बेसनाचं मिश्रण आणि मीठ घाला. मोठ्या आचेवर मिश्रण उकळा. मग आच कमी करा. जवळपास १५ मिनिटं मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
·       आता पकोड्यांसाठी बेसनमध्ये पाणी घालून घट्ट भजीसारखं पीठ तयार करा आणि ते व्यवस्थित फेटा.
·       यामध्ये हिरव्या मिरच्या, लाल तिखट, मीठ आणि गरम तेल घाला. पुन्हा एकवार फेटा. मग गरम तेलात याचे पकोडे तयार करा.
·       शिजलेल्या कढीमध्ये पकोडे टाका आणि ५ मिनिटं आणखी मंद आचेवर शिजू द्या. यानंतर सर्व्हिंग बाऊलमध्ये कढी ओता.
·       एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये लाल मिरची परता आणि ही फोडणी कढीवर ओता. वरून फोडणी घातल्यानंतर या पदार्थाला एक वेगळंच रूप मिळतं.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search