आसा रसाळ गोजिरी
राण्डेच्या म्हतल्यान तरी प्रेम वतता
आवशिक खाव म्हतल्यान
तरी माया पाझारता
वॉशिंग मशीन इली आनी सकला व्हाळार
जावचा बंद
झाला
घरघंटी इली नि व्हनीबाय जात्यार
बसाना झाली
ट्रँक्टर इलो तसो बाबलो जॉत
धरीना झालो
आणि ढवळो-पवळो गोट्यात सुकान गेलो
इरला आता दिसाना झाला
नि उकड्या तांदळाची पेज शिजाना झाली
इलस-गेलस, हडे -तडे करून बाबाचो स्टेटस
खालती इलो
आये म्हणता मराठी बोल
बाबा म्हणता विन्ग्लिश शाळेत जा
पप्पा मम्मीच्या ह्या गोंधळात सकला-
नकला धापो झाला
आताशी म्हातारी करवादता
कोनशाक बसान दुका गाळता
कान तिचे आशालेत आयकाक
आराड गे बांडके सांज जावंदे
आये माझी बेगीन घरा येवंदे
बाबल्या... तुया झाटलीमन झालस
इसरा नको आपल्या मायबोलीक
जिवाच्या आकांतान, बोम्बयेच्या देठातसून
जप तिका फुलासारखी
मालवणी ती मालवणी
मालवणी ती मालवणी...