दोन टोमॅटो बारीक चिरून घ्या,एक चिरलेला कांदा,एक चमचा तेल,फोडणीसाठी पाव चमचा जिरे, चिमूटभर हिंग, थोडीशी हळद, कढीपत्ता पाने,तीन ते चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्या,अर्धा चमचा आले पेस्ट,एक चमचा गुळ,चवीनुसार मिठ,आणि कोथिंबीर
कसे तयार कराल:
आधी कढईत तेल गरम करून जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता आणि मिरच्या घालून फोडणी द्यावी आणि त्यात आले पेस्ट घालून मिक्स करावे आता त्यात चिरलेला कांदा घालावा थोडे मिठ घालून कांदा परतून घ्यावा.कांदा निट शिजला कि त्यात चिरलेला टोमॅटो घालून ढवळावे. मध्यम गैस वर झाकण ठेवून टोमॅटो शिजू द्यावा.टोमॅटो अर्धवट शिजला कि त्यात गूळ घालावा. निट मिक्स करून टोमॅटो शिजू द्यावा,गरजेनुसार मिठ घालावे. कोथिंबीर घालावी.आणि तयार भाजी गरम गरम पोळीबरोबर सर्व्ह करावी.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार