बेबी कॉर्न पकोडे अर्थात मक्याची भजी
साहित्य: दोन वाट्या
अमेरिकन कोवळे बेबी कॉर्न मक्याचे दाणे,पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, एक वाटी ज्वारीचे पीठ,चार टेबलस्पून बेसन पीठ,चवीनुसार/दोन चमचे हिरव्या
मिरच्यांचा ठेचा ,एक चमचा जिरे,मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर,चवीनुसार मीठ,आवश्यकतेनुसार तळण्यासाठी तेल.
कृती: प्रथम बेबी कॉर्न मक्याचे
दाणे भरडसर वाटून घ्यावेत. (फार पेस्ट करू नये, फक्त
अर्धवट मोडले जातील असेच वाटावेत.),भरडलेल्या मक्याच्या दाण्यात ज्वारीचे पीठ, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, मिरच्यांची पेस्ट, जिरे, बेसन पीठ, कोथिंबीर आणि
मीठ घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे पाणी घालून दाटसर पीठ भिजवावे. पीठ पातळ
भिजवू नये, चिकटसर असे भिजवावे.
गॅसवर एका कढईत तेल गरम करत ठेवावे. आच मध्यम ठेवावी. चमच्याने लहान लहान गोळे तेलात घालून भजी तळून घ्यावी. चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावी.
गॅसवर एका कढईत तेल गरम करत ठेवावे. आच मध्यम ठेवावी. चमच्याने लहान लहान गोळे तेलात घालून भजी तळून घ्यावी. चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावी.