साहित्य
·
वड्यांसाठी
·
३ वाट्या तांदूळ,
·
१ वाटी मोड आलेली मटकी, २ वाट्या हरबऱ्याची डाळ, १ वाटी तुरीची डाळ, पाऊण वाटी उडदाची डाळ
·
मिरच्या, थोडे
लाल तिखट, बारीक
चिरलेला कांदा अर्धी वाटी, धने-जिरे
पूड, लसूण, कोथिंबिर, कढीपत्ता, मीठ, फोडणीसाठी तेल. (हळद घालू नये)
·
भातासाठी
·
दोन वाटया तांदळाचा मोकळा फडफडीत भात
·
तेल
·
फोडणीचं साहित्य
पाककृती
·
सर्व डाळी रात्री भिजत घालून सकाळी जाडसर वाटाव्या. मटकीही जाडसर
वाटून घ्यावी.
·
मिरची-लसूण जाडसर वाटाव्यात. सर्व साहित्य वाटलेल्या डाळीत घालावे
आणि सर्व एकजीव करावे. वाटलेल्या डाळीचे छोटे-छोटे चपटे वडे थापून गरम तेलात तळून
काढावे.
·
नंतर २ वाटया तांदळाचा साधा मोकळा भात करून घ्यावा. ज्या तेलात वडे
तळले तेच तेल गरम करायला ठेवावे. प्रत्येकाला पानावर भात वाढला की ४-५ वडे
कुस्करून घालावे.
·
मोहरी , हिंग , हळद घालून तेलाची फोडणी भातावर घालावी . जास्त तिखट खाणार्यांनी
वरील तेलात ४/६ मिरच्या घालून तेल भातावर घ्यावे.
·
या भाताबरोबर (साखर न घालता) ताकाची कढी करावी.
पाककृतीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे
एकूण वेळ : ३५ मिनिटे