साहित्य
·
१ वाटी हरभरा डाळ
·
५ ते ६ हिरव्या मिरच्या
·
८ ते १० लसूण पाकळ्या
·
१ इंच आले
·
१० ते १५ कढीपत्ता पाने
·
१/२ टिस्पून हळद
·
१ टिस्पून जीरे
·
१ टिस्पून तीळ
·
१/२ कप कोथिंबीर, बारीक
चिरून
·
तळण्यासाठी तेल
·
चवीपुरते मीठ
पाककृती
·
हरभरा डाळ धुवून २ ते ३ तास भिजवावी.
·
भिजल्यावर चाळणीत ओतून अर्धा तास ठेवावी म्हणजे बरेचसे पाणी निथळून
निघून जाईल.
·
मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, आले, लसूण, कढीपत्ता आणि थोडेसे मीठ घालून अर्धवट
बारीक करावे. उरलेली डाळसुद्धा अशाच प्रकारे अर्धवट बारीक करावी.
·
वाडग्यात वाटलेली डाळ काढून घ्यावी. चव पाहून मिरची पेस्ट, मीठ घालावे. तसेच चिरलेली कोथिंबीर, हळद आणि जिरे घालून मिक्स करावे.
·
कढईत तेल गरम करावे. प्लास्टिक पेपरला तेलाचा हात लावून जाडसर वडा
थापावा. गरम तेलात मध्यम आचेवर तळून काढावा.
·
गरम गरम वडा हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंचेच्या आंबटगोड चटणीबरोबर सर्व्ह
करावा.
पाककृतीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिट (डाळ भिजवण्याचा वेळ वगळून)
एकूण वेळ : ३५ मिनिटे