९/०७/२०१८

कोळंबी पुलाव


साहित्य

·       १ वाटी साफ केलेली कोळंबी
·       १ वाटी मटारचे दाणे
·       ३ वाट्या बासमती किंवा दिल्ली राईस
·       २ कांदे
·       ७-८ लसूण पाकळ्या
·       हळद
·       ४ लवंगा
·       ४ वेलदोडे
·       मसाला वाटण
·       २ चमचे धने
·       २ चमचे खसखस
·       १ चमचा शहाजिरे
·       १०-१२ काळी मिरी
·       २-३ दालचिनीचे तुकडे
·       १०-१२ लाल मिरच्या
·       १०-१५ काजू
पाककृती

·       लसूण बारीक वाटून घ्यावी.
·       नंतर थोडीशी हळद आणि वाटलेली लसूण कोळंबीला लावून ठेवावी.
·       कांदा चिरून घ्यावा आणि मसाला बारीक वाटून घ्यावा.
·       एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून लवंग-वेलदोड्याची फोडणी करावी. नंतर त्यात मटारचे दाणे व कोळंबी घालून जरा परतावे.
·       नंतर त्यात २-३ तास अगोदर धुतलेले तांदुळ घालून परतावे. तांदुळाच्या दुप्पट गरम पाणी घालून मीठ व वाटलेला मसाला घालावा.
·       नंतर बारीक गॅसवर भात शिजू द्यावा.
·       पुलाव तयार झाल्यावर त्यावर एक चमचा साजूक तूप घालावे व एका लिंबाचा रस घालून गरम गरम वाढावा.
·       भाताला खाण्याच्या रंगात टाकून रंगीत कोळंबी पुलाव बनवू शकता त्यामुळे हा दिसायलाही आकर्षक दिसतो.
पाककृतीसाठी लागणारा वेळ : २५ मिनिटे
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : २५ मिनिटे
एकूण वेळ : ५० मिनिटे
पदार्थाचा प्रकार : जेवणातील पदार्थ

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search