९/१६/२०१८

टोमॅटोचे सूप

टोमॅटोचे सूप


साहित्य : चार लालबुंद मोठ्ठे टोमॅटो,एक मध्यम आकाराचा कांदा,चार लसणाच्या पाकळ्या,चार काळे मिरे,आल्याचा छोटा तुकडा,चवीपुरते मीठ , लाल तिखट व साखर,सूप दाट होण्यासाठी चमचाभर शिळ्या पावाचा मिक्सरवर करून घेतलेला चुरा किंवा तो नसेल तर कॉर्न फ्लॉवर ,सुपात टाकण्यासाठी वाटीभर ब्रेड क्रम्स ( म्हणजेच तळलेले पावाचे छोटे छोटे तुकडे) ,चिमूटभर लाल खाण्याचा रंग
कृती : प्रथम एका मोठ्या भांड्यात थोडे पाणी घालून त्यात टोमॅटो,चिरून मोठ्या फोडी केलेला कांदा,लसणाच्या पाकळ्या,मिरे,आल्याचा छोटा तुकडा, चवीनुसार मीठ,लाल तिखट व साखर हे सगळे एकत्र करून शिजवून घ्या,थंड झाल्यावर टोमटोची साले काढून मिक्सरच्या मोठ्या (टाकाच्या)  भांड्यातून  कपभर पाणी घालून फिरवून घ्या. पुन्हा मोठ्या स्टीलच्या पातेल्यात काढून घ्या व त्यात चार कप पाणी घालून उकळायला ठेवा,फार पात्तळ वाटले तर सूप दाट होण्यासाठी चमचाभर शिळ्या पावाचा मिक्सरवर करून घेतलेला चुरा किंवा तो नसेल तर कॉर्न फ्लॉवर लावा व जर लाल रंग कमी वाटत असेल तरच चिमूटभर खायचा लाल रंग घाला आणि उकळी आल्यावर गॅस बंद करा.

हे सूप सर्व्ह करतेवेळी एका बाउल मध्ये सूप घालून त्यात  ५-६ सोनेरी रंगावर तळलेले छोटे छोटे ब्रेड क्रम्सचे तुकडे घालून सर्व्ह करा.  

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search