१०/०९/२०१८

फालूदा


साहित्य

·       २ मध्यम बाऊल व्हॅनिला आईस्क्रिम
·       १ वाटी फालूदा शेव
·       गुलाबाचे सरबत
·       अर्धा कप ताजे क्रीम
·       १ लिटर दूध
·       २ छोटे चमचे गुलाब इसेन्स
·       १/२ वाटी बदाम व पिस्ते
·       चार चमचे साखर
पाककृती

·       दूधात साखर घालून दूध आटवून घ्या.
·       थंड झाल्यावर त्यात गुलाब इसेन्स घाला.
·       फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा
·       सर्व्ह करतांना आईस्क्रिम ग्लासात गुलाब सरबत, मग फालूदा शेवया, नंतर त्यावर गार केलेले दूध घाला.
·       नंतर व्हॅनिला आईस्क्रिम घालून त्यावर क्रीम घालून वर बदाम पिस्ते घालून सजवा.
·       यामध्ये तुम्हाला आवडणारा आईस्क्रीम फ्लेवर, इसेन्स घालून त्याची चव वाढवू शकता.Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search