साहित्य
·
अर्धी वाटी पोहे
·
अर्धी वाटी रवा
·
एक वाटी घट्ट मलईचे दही
·
हिरव्या मिरचीचा ठेचा
·
चवीनुसार मीठ
·
अर्धा छोटा चमचा फ्रूट सॉल्ट
·
तेल
·
बारीक मूठभर चिरलेली कोथिंबीर
·
फोडणीचे साहित्य : एक टेबलस्पून तेल, अर्धा चमचा मोहरी, एक छोटा चमचा हळद, चिमूटभर हिंग, एक छोटा चमचा जिरे, ८-१० कढीपत्त्याची पाने
पाककृती
·
एका खोलगट आकाराच्या बाऊलमध्ये दही व एक कप पाणी एकत्र घेऊन चांगले
मिक्स करा.
·
मग त्यात रवा व पोहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा,चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.
·
हे मिश्रण एकजीव होण्यासाठी १०-१५ मिनिटे मुरण्यासाठी एका बाजूला
ठेवा.
·
या पिठाचा ढोकळा उकडायला लावण्यापूर्वी त्यात फ्रूट सॉल्ट व दोन
टेबलस्पून पाणी घाला व पिठातून बुडबुडे येऊ लागले की ढवळून घेऊन गोल पसरट
भांड्याला आतून सगळीकडून तेलाचा हात लावून घेऊन त्या भांड्यात हे पीठ ओता.
·
मग ते भांडे इडलीपात्रात ठेवा व १०-१५ मिनिटांनी ढोकळा तयार
झाल्याची खात्री करून घेऊन इडलीपात्रातून बाहेर काढा व एका बाजूला ठेवा.
·
दुसरीकडे गॅसवर एका कढल्यात फोडणीसाठी तेल गरम करून घ्या व तेल
चांगले गरम झाले की त्यात मोहरी टाकून ती चांगले तडतडली की हिंग घालून मध्यम आचेवर
एक मिनिट फोडणी परतून घ्या आणि नंतर ती फोडणी पॅनमध्ये तयार झालेल्या ढोकळ्यावर
ओता.
·
मस्त वड्या कापून कोथिंबिरीने सजावट करून सर्व्ह करा.