११/१९/२०१८

हलवा ग्रीन मसालासाहित्य

·       हलव्याचे सहा तुकडे
·       पाव टी स्पून हळद
·       आले
·       पाव टी स्पून गरम मसाला
·       ७-८ पाकळ्या लसूण
·       २ ओल्या  मिरच्या
·       मीठ
·       कोथिंबीर
·       २ टी स्पून तेल
·       ५-६ काळी मिरी
·       थोडी चिंच
पाककृती

·       हलव्याचे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत.
·       आले, लसूण, मिरची, काळी मिरी आणि चिंच एकत्र वाटून हलव्याच्या तुकड्यांना लावून घ्यावे.
·       त्यानंतर मीठ, हळत आणि गरम मसाला लावून साधारण अर्धा तास हे मिश्रण तसेच ठेवावे.
·       तव्यावर तेल घेऊन त्यात हलव्याचे तुकडे घालावेत आणि मंद आचेवर शिजवावेत.
·       थोड्या  वेळाने थोडे चिंचेचे पाणी त्यावर शिंपडावे.
·       वर झाकण ठेवून हे मिश्रण व्यवस्थित शिजू द्यावे.
·       खालच्या बाजूने हे तुकडे शिजल्यानंतर काही वेळाने ते परतून पुन्हा शिजू द्यावेत.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search