११/१९/२०१८

ब्रेड पिझ्झासाहित्य

·       साध्या ब्रेडचे स्लाईस (पिझ्झा चे नाही)
·       पिझ्झा सॉस
·       टोमॅटो सॉस
·       भोपळी मिरचीचे पातळ काप
·       कांद्याचे पातळ काप
·       टोमॅटोच्या चकत्या
·       मिरपूड
·       बटर
·       अर्धा ते पाऊण कप किसलेले चीज
·       चवीनुसार मीठ
·       सुक्या लाल मिरच्यांचा चुरा आवडीनुसार (ड्राय रेड चिली फ्लेक्स)
पाककृती

·       ब्रेड स्लाइसला दोन्ही बाजूला बटर लावून एका बाजूने तव्यावर भाजून घ्या.
·       भाजलेल्या बाजूला पिझ्झा सॉस लावा. त्यावर टोमॅटो, कांदा आणि भोपळी मिरची घाला, त्यावर मीठ आणि मिरपूड पेरा.
·       आवडीनुसार चीज घाला. झाकण ठेवून साधारण १० मिनिटे बेक करा किंवा चीज वितळून किंचित सोनेरी झाले, की लगेच पिझ्झा काढा.
·       गरमागरम सर्व्ह करा. सर्व्ह करताना वरून टोमॅटो सॉस आणि चिमूटभर ड्राय रेड चिली फ्लेक्स पसरा.
·       यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या उदा. स्वीट कॉर्न, ऑलिव्ह, पनीर इ. घालून ब्रेड पिझ्झा बनवू शकता.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search