साहित्य
·
१०-१२ नग तयार इडल्या
·
तीन चमचे कॉर्नफ्लोअर
·
दोन टेबलस्पून मैदा
·
एक चमचा आले-लसणाची पेस्ट
·
तीन चमचे लाल मिरचीचे तिखट
·
बारीक चिरलेली एक सिमला मिरची
·
एक चमचा आल्याचा कीस
·
बारीक चिरलेल्या ३-४ लसणाच्या पाकळ्या
·
पाव चमचा सोया सॉस
·
दोन टेबलस्पून टोमॅटो सॉस
·
पाव चमचा काळी मिरीची पूड
·
एक बारीक चिरलेला कांदा
·
एक टेबलस्पून बारीक चिरलेली कांदापात
·
चवीनुसार मीठ.
पाककृती
·
तयार इडल्या अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा व अर्ध्या तासाने फ्रिजमधून
काढून त्यांचे छोटे छोटे चौकोनी तुकडे कापून ठेवा.
·
एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, आले-लसणाची पेस्ट, लाल तिखट एकत्र करा.ॉ
·
मिश्रणात पाणी घालून फेटून घेऊन दाट पेस्ट बनवा.
·
गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करा.
·
तयार केलेल्या पेस्टमध्ये इडलीचे तुकडे बुडवून ते तेलात गोल्डन
ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्या.
·
एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर पसरून त्यात हे टोस्ट केलेले इडल्यांचे
तुकडे ठेवा.
·
आता गॅसवर एका फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून घ्या.
·
त्यात किसलेले आले, बारीक चिरलेला लसूण व कांदा घालून 3-4 मिनिटे मध्यम आचेवर कांदा गोल्डन
ब्राऊन होईपर्यंत परता.
·
मग त्यात चिरलेली सिमला मिरची घालून परता.
·
सिमला मिरची शिजून मऊ झाली की त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस, कॉर्नफ्लोअरचे मिश्रण आणि मीठ घालून
एकजीव करा व परतत रहा.
·
थोडेसे पाणी घालून ढवळत रहा.
·
जेंव्हा मंचूरियन
सॉसमध्ये उकळी येईल तेंव्हा
त्यात इडली व काळी मिरीची पूड घालून एकजीव करून घ्या आणि आणखी २-३ मिनिटे शिजवून
घेऊन गॅस बंद करा. गरम इडली मंचूरियन फ्राइड राईससोबत सर्व्ह करा.