१२/०३/२०१८

उपवासाचे बटाटे

साहित्य

·       सारणासाठी
·       १०-१२ माध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
·       एक कच्चा बटाटा किसून
·       आले
·       हिरव्या मिरच्या व जिरे यांची पेस्ट
·       चवीनुसार मीठ
·       साखर
·       दोन चमचे शेंगदाण्याचे कूट
·       बारीक चिरलेली कोथिंबीर
·       ७-८ कढीपत्त्याची पाने
·       चार टेबलस्पून खोवलेले ओले खोबरे
·       दोन चमचे लिंबाचा रस
·       पारीसाठी साहित्य
·       अर्धी वाटी राजगिऱ्याचे पीठ
·       अर्धी वाटी शिंगाड्याचे पीठ
·       अर्धी वाटी साबुदाण्याचे पीठ
·       मीठ चवीनुसार
·       एक टेबलस्पून तेल
पाककृती

·       उकडलेले बटाटे सोलून घ्या व स्मॅश करून ठेवा.
·       एका बाऊलमध्ये बटाट्याचा लगदा, आले, हिरव्या मिरच्या व जिरे यांची पेस्ट, मीठ, साखर, शेंगदाण्याचे कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, खोवलेले खोबरे, व लिंबाचा रस एकत्र करून हे सर्व मिश्रण एकजीव करा.
आता या मिश्रणाचे गोल चपटे वडे थापून ठेवा.
·       नंतर एका बाऊलमध्ये राजगिरा, शिंगाडा व साबुदाणा ही सर्व पीठे एकत्र करून त्यात पाणी घालून ओलसर पीठ बनवा.
या पीठात मीठ, मिरचीचा ठेचा व एक किसलेला कच्चा बटाटा घाला.
·       दुसरीकडे गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवा.
·       तेल पुरेसे गरम होताच त्यातील एक टेबलस्पून कडकडीत तेल काढून पारीसाठी सरबरीत केलेल्या पिठात घालून मिश्रण एकजीव करा.
·       आता वडे सरबरीत पिठात सगळीकडून छान घोळवून घ्या व कढईतील गरम तेलात सोडून गोल्डन ब्राऊन रंगावर तळून काढा.
गरमागरम वडे कोथिंबीर-खोबर्‍याच्या हिरव्या किंवा खजुर-चिंचेच्या आंबट-गोड चटणी सोबत सर्व्ह करा.Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search