साहित्य
·
५-६ उकडलेले
बटाटे
·
दोन वाट्या ताजा कोवळा मटार
·
एक वाटी किसलेले चीज
·
एक वाटी नारळाचे खोवलेले खोबरे
·
एक वाटी कोथिंबीर
·
एक टेबलस्पून आले-मिरची पेस्ट
·
दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
·
एक टेबलस्पून लिंबाचा रस
·
चवीनुसार मीठ आणि साखर
·
फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग व हळद.
पाककृती
·
गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी व जिरे टाकून
दोन्ही चांगले तडतडल्यावर त्यात मटार घालून २-३ मिनिटे परतून घ्या.
·
मग त्यात खोवलेले ओले खोबरे, मीठ, साखर, हिरवी मिरचीची पेस्ट व लिंबाचा रस
घालून पुन्हा परतून घेणे
·
मटार जास्त कडक होऊ देऊ नका. त्यात किसलेले चीज घालून पुन्हा
थोडेसे परता. गॅस बंद करा.
·
उकडलेल्या बटाट्यात मीठ व कॉर्नफ्लोअर घालून मळून गोळा तयार करा.
·
त्यात मटार व चीजचे सारण भरा. पारीचे तोंड बंद करून त्याला गोल
चपटा आकार देऊन गरम तेलात तळा. सॉसबरोबर सर्व्ह करा.