१/०२/२०१९

काश्मिरी मटण चॉप्स


साहित्य

·       १० चॉप्स बेस्ट
·       ६ हिरवी वेलची
·       २ चमचे बडीशेप
·       ५ लवंगा
·       २ मध्यम दालचिनीचे तुकडे
·       ४ कप दूध
·       अर्धा वाटी बेसन
·       पाव वाटी मिरचीपूड
·       अर्धा चमचा हिंग
·       १ लिंबाचा रस
·       अर्धा कप तूप
पाककृती

·       प्रथम वेलची, लवंग, दालचिनी आणि बडीशेप एका कापडाच्या तुकड्यात बांधून त्याची पुरचुंडी करा.
·       मोठ्या पसरट पातेल्यात चॉप्स घालून त्यात दूध, अर्धा लिटर पाणी आणि ही मसाल्याची पुरचुंडी घालून ४० मिनीटे मध्यम गॅसवर चॉप्स शिजेपर्यंत व पाणी आटेपर्यंत ठेवा.
·       चॉप्स शिजत असतानाच बेसन व तांदळाचे पीठ, थोडे पाणी घालून भाज्याच्या पिठासारखे भिजवा.
·       पिठामध्ये मीठ, लाल मिरचीपूड, हिंग घालून फेटा.
·       शिजलेले मटण चॉप्स खाली उतरवून जरा थंडा करा.
·       कढईत तूप तापवून त्यात चॉप्स पिठात घालून हलकेच सोडा व सोनेरी रंगावर तळून घ्या.
·       गरमागरम काश्मिरी मटण चॉप्स चटणी वा सॉससोबत सर्व्ह करा.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search