Recent Posts

तडका - आमची खंत

१/०३/२०१९

आमची खंत

शिकला जरी समाज
तरीही मनी खंत आहे
वैचारिकतेची गती इथे
अजुनही का संथ आहे

सावित्रीच्या लेकींचा इथे
अजुनही बाट होतो आहे
शिकलेल्यांच्याही मतीत
अविचारी घाट येतो आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३