साहित्य
·
दीड वाटी मैदा
·
अर्धी वाटी कणीक
·
एक वाटी कढीपत्त्याची पाने
·
चवीनुसार दोन ते तीन हिरव्या मिरच्या व मीठ
·
एक टेबलस्पून चाट मसाला
·
तळण्यासाठी गरजेनुसार तेल
पाककृती
·
सर्वप्रथम कढीपत्याची पाने धुवून, पुसून कोरडी करून घेऊन मिक्सरमध्ये
घालावीत.
·
त्यातच हिरव्या मिरच्या व थोडे मीठ घालून जाडसर भरड वाटून घ्यावे.
·
नंतर एका परातीत मैदा, कणीक व वरील कढीपत्त्याचे मिश्रण आणि
चवीनुसार मीठ घालून पीठ घट्ट भिजवावे.
·
अर्ध्या तासानंतर पीठ एकसारखे करून त्याचे चार गोळे करावेत. नंतर
हे गोळे पाटावर पातळ लाटावेत.
·
एका कढईत तेल चांगले तापवून घ्यावे व लाटलेल्या पोळीचे कातण्याने
किंवा सूरीने पातळ पातळ काप करावेत.
·
तापलेल्या तेलात हे काप खमंग तळून घ्यावेत व वरून चाट मसाला
भुरभुरावा. गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावे. चटकदार चटपटीत कुरकुरे
तयार.