साहित्य
·
सारणासाठी
·
१ वाटी किसलेला गूळ
·
पाव वाटी बेसन व कणीक मिळून घ्या
·
तीळ, खसखस
भाजून केलेली पूड पाव वाटी
·
दीड टे.स्पून साजूक तूप व तेल मिळून घ्या.
·
वेलदोडे-जायफळ पूड पाव चमचा
·
पारीसाठी
·
दीड वाटी न चाळलेली कणीक
·
पाव वाटी मैदा
·
पाव वाटी बारीक चाळलेलं बेसन
पाककृती
·
तेल व तूप गरम करून त्यात बेसन व कणीक खमंग भाजा.
·
गॅस बंद करून इतर साहित्य घाला.
·
थंड झाल्यावर त्यात किसलेला गूळ घालून चांगले एकजीव करा.
·
कणीक, मैदा
आणि बेसन एकत्र करावे.
·
दोन टे.स्पून कडक तेलाचं मोहन घाला.
·
घट्टसर कणीक भिजवा
·
पोळ्या करतांना दोन कणकेच्या लाट्यांमध्ये एक गुळाची लाटी ठेवा
·
गूळ घट्ट वाटल्यास दुधाच्या हाताने मऊ करा.
पाककृतीसाठी लागणारा वेळ : ४५ मिनिटे
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : २५ मिनिटे
एकूण वेळ : सव्वा तास